वर्षपूर्ती! ठाकरे सरकारच्या 1 वर्षाच्या कामगिरीचा संपूर्ण आढावा

साम टीव्ही
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

दादर येथील शिवतीर्तावर 28 नोव्हेंबर 2019 रोजी ठाकरे घराणातल्या पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवा इतिहास घडवला. 

महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री राज्याला लाभलाय. उद्धव ठाकरेंकडे संघटन कौशल्य असलं तरी सरकार चालवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागलीय. ठाकरे सरकारचा गाडा व्यवस्थित चालला असला तरी जनतेच्या मनात हे सरकार घर करणार का? हा एक महत्वाचा सवाल आहे. 

दादर येथील शिवतीर्तावर 28 नोव्हेंबर 2019 रोजी ठाकरे घराणातल्या पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवा इतिहास घडवला. 

आरे कारशेड प्रकल्पाला स्थगिती देण्याचा पहिलाच निर्णय घेऊन त्यांनी भाजपला विषेशता देवेंद्र फडणवीस यांना जोरदार धक्का दिला. भाजप अजूनही या शॉकमधून बाहेर पडू शकला नाही 

उद्धव ठाकरेंना पक्ष संघटना चालवण्याचा अनुभव आहे, सरकार चालवण्याचा नाही.मात्र अधिवेशनातील पहिल्याच भाषणात त्यांनी हम कीसी से कम नाही याची झलक दाखवली. मुख्यमंत्रीपदाचा हनिमून पिरियड संपत नाही तोवर कोरोना ने मोठं आव्हान उभं केलं.मात्र जनतेशी संवाद साधत अंत्यत संयम आणि धिराने उद्धव ठाकरेंनी या संकटाशी हात दोन हात केले. 

कोरोनाच्या संकटातच महापुराने थैमान घातलं. मात्र  मातोश्रीच्या बाहेर पडत नसल्यामुळे विरोधकांच्या टीकेचे लक्ष ठरले. शेवटी शरद पवारांच्या मैदानात उतरावं लागलं. 

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण , कंगणा राणावत, अर्नब गोस्वामीची पीडा ठाकरे सरकारच्या मागे लागली. सुरुवातीला बॅक फूटवर गेलेल्या ठाकरे सरकारने हा डाव पलटवला. कंगणाचे कार्यालय जमिनदोस्त झाले तर अर्नबची रवानगी तळोजा तुरुंगात केली. त्यातून केंद्रालाही सज्जड दम दिला गेला  

ठाकरें सरकारने ही सगळी संकट लिलया पेलली असली तरी सरकारमधील आपसातील धुसफूस मात्र संपवता आलेली नाही. ठाकरेंना थेट जनतेशी संवाद साधण्याचे कसब आत्मसात करावे लागणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live