कर्जदारांना दिलासा! 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सर्वसामान्यांना सवलत

Concessions to the general public on loans up to Rs 2 crore
रविवार, 25 ऑक्टोबर 2020
  • 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सर्वसामान्यांना सवलत
  • कोरोना काळातील 6 महिन्यांवर सवलत
  • चक्रवाढ व्याज, साधे व्याज यांच्यातील फरकाइतकी रक्कम सरकार देणार

सरकारनं सामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. कर्जावरील व्याजावर सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पाहुयात एक रिपोर्ट

केंद्र सरकारनं सामान्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केलीय. या घोषणेमुळे ज्यांनी कर्ज घेतलंय, त्यांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. मॉरॅटोरियम कालावधीतील शुल्क माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कर्ज फेडण्यासाठी दिलेल्या कालावधीशी संबंधित व्याजावर सूट देण्यास मंजूरी देण्यात आलीय. 

दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सर्वसामान्यांना ही सवलत मिळणार आहे. सहा महिन्यांसाठी दिल्या गेलेल्या सवलतीच्या कालावधीत चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यांच्यातील फरकाइतकी रक्कम सरकार देणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजावर सूट देण्याची योजना लवकरात लवकर लागू करण्याचे आदेश केंद्राला दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सामान्यांचं तोंड गोड होणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live