VIDEO | जिल्हा रुग्णालयात सलाईनच्या बाटलीत शेवाळं आढळल्याने खळबळ

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 29 जानेवारी 2020

बीड : जिल्हा रुग्णालयात सलाईनच्या बाटलीत शेवाळं आढळल्याने खळबळ माजलीय.... रुग्णालयातील नर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.. .आणि रुग्णावरील संकट टळलं.... राज्यपातळीवर शासकीय खरेदी करून रुग्णालयांना हे सलाईन पाठविण्यात आले आहे... डेनिस केम लॅब या उत्पादक कंपनीचे हे सलाईन आहे... या बॅचची मुदत सप्टेंबर 2020 मध्ये संपणार आहे. या बाटतील द्रवामध्ये मोठ्या प्रमाणावर शेवाळाचे घोष आढळून आले आहेत...विशेष म्हणजे नेत्र विभागात ही सलाईन आढळून आलीय.

एका परिचारकांच्या सतर्कतेने हा सर्व प्रकार उघड झालाय. ही सलाईन एखाद्या रुग्णाच्या उपचारासाठी वापरण्यात आली असती तर याचा परिणाम काय झाला असता याचा विचार न केलेलाच बरा. रुग्णाच्या उपचारासाठी लावण्यात येणाऱ्या सलाईनचे घटक नसे द्वारे पूर्ण शरीरात रक्तात मिसळले जातात. त्यामुळे ही सलाईन रुग्णासाठी वापरण्यात आली असती तर एखाद्या रुग्णाला इन्फेक्शन होऊन मृत्यू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे आता सलाईनच्या पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई होणार हे पाहणे देखिल तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. '

नेहमीच वेगवेगळ्या कारणास्तव जिल्हा रुग्णालय चर्चेत असतो. मात्र आता घडलेल्या प्रकाराने जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी कारवाईचे आदेश दिलेत.पूर्णतः निर्जंतुकीकरण करून तयार केलेल्या या बाटलीत शेवाळ तयार कसे झाले? हा मोठा प्रश्न आहे... तसंच  ज्या कंपनीच्या बाटलीत हे शेवाळ आढळले आहे, त्याबाबत आता सरकार काय निर्णय घेणार? हे पाहावे लागणार आहे. 

WebTittle :: Concussion due to algae found in a saline bottle at District Hospital

संबंधित बातम्या

Saam TV Live