महाविकास आघाडीत सरकारमध्ये काँग्रेस आक्रमक, आघाडीतील वाद चव्हाट्यावर! वाचा काय घडलंय?

साम टीव्ही
गुरुवार, 24 डिसेंबर 2020
  • महाविकास आघाडीत सरकारमध्ये काँग्रेस आक्रमक
  • किमान समान कार्यक्रमासाठी काँग्रेस आक्रमक
  • महाविकास आघाडी सरकारमधील वाद चव्हाट्यावर
  • बांधकाम अधिमूल्य 50% कपात प्रस्तावाला आक्षेप

महाविकास आघाडी सरकारमधला वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. सरकारमधील आपल्या समान हक्कासाठी काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळतेय. बांधकाम अधिमूल्य 50 टक्के कपात या प्रस्तावाला काल काँग्रेसने विरोध केला होता.

 

चिंताजनक! ब्रिटनमधून आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह, सर्वांची चिंता वाढली...

मंत्रीमंडळ बैठकीत अचानक हा प्रस्ताव आला म्हणून काँग्रेसनं यावर आक्षेप  घेतलाय. इतका मोठा विषय आहे तर त्यावर आधी चर्चा झाली पाहिजे असं काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी म्हंटलंय. मंत्रिमंडळ बैठकीतील आहे त्यामुळे मी बाहेर जास्त काही बोलणार नाही असंही चव्हाण म्हणालेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीतला वाद पुन्हा एकदा समोर् आलाय. 

पाहा अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले -


संबंधित बातम्या

Saam TV Live