उद्धव ठाकरे सरकारमुळे झालेल्या कोविड हत्याकांडावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस आंदोलन - किरीट सोमय्या

kirit
kirit

सोलापूर -  कोरोना लसीकरणावरून मुंबईमध्ये Mumbai काँग्रेस केंद्र Central Government सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्धव ठाकरे सरकारमुळे झालेल्या कोविड हत्याकांडावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस हे आंदोलन करत असल्याची टीका भाजपा नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya यांनी केली आहे. किरीट सोमय्या हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. Congress agitation to divert attention from covid massacre caused by Uddhav Thackeray government

राहुल गांधी Rahul Gandhi आणि उद्धव ठाकरे Uddhav Thackeray या दोघांना ही माहितीय की,भारतात लसींच उत्पादन दोन कंपन्या करतात आणि त्यातील महत्वाची कंपनी ही पुण्यात असून त्याचे मालक हे शरद पवारांचे मित्र आहेत.

त्यामुळे लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांच उत्पादन वर्षाच 10 कोटी होत असेल तर तर देशातील सर्व लोकांना लस मिळायला वेळ लागणारच आहेत. असं स्पष्टीकरण सोमय्यांनी दिल आहे. दरम्यान,एप्रिल महिन्यात जे मृत्युकांड महाराष्ट्रात झालं आहे त्याचा आणि लसचा काय संबंध आहे असा प्रश्न ही सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे भाजप येत्या काळात महाराष्ट्रातील कोविड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणारं आहे.यामध्ये महाराष्ट्रातील तेरा महत्वाच्या शहरांमध्ये किरीट सोमय्यांसह आणखी दोन सी.ए.मिळून हे ऑडिट करणार आहे. त्याचबरोबर येत्या 31 डिसेंबर पर्यंत भारतात अडीचशे कोटी लसींच उत्पादन भारतात होणार आहे, त्यातील सव्वादोनशे कोटी लसी भारतात बनवल्या जाणार आहेत.तर पंचवीस कोटी लसी इंपोर्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत प्रत्येक भारतीयांचं लसीकरण झालेलं असेल असं ही किरीट सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.Congress agitation to divert attention from covid massacre caused by Uddhav Thackeray government

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com