राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री? प्रस्तावावर शिवसेनाही अनुकूल, वाचा पुढे कशी असतील राजकीय समीकरणं?

साम टीव्ही
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021
  • राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री? 
  • प्रस्तावावर शिवसेनाही अनुकूल
  • विधानसभा अध्यक्षपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद?

महाविकास आघाडीत, फारसं महत्व मिळत नसल्याबाबत, काँग्रेसनं अनेकदा नाराजीचा सूर लावलाय. मात्र आता, महाविकास आघाडी सरकारमध्ये, वजन वाढावं यासाठी, काँग्रेसनं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना, एक पर्याय दिल्याचं समजतंय.

महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळणाऱ्या काँग्रेसला बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदासह काही महत्त्वाची खाती मिळावीत, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडण्यात आल्याचं समजतंय. त्यानुसार महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागून त्या बदल्यात शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद देण्याचं घाटतंय. 

राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी यांचा वाद विकोपाला जाण्याची चिन्हं

नाना पटोलेंनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासोबतच एखाद्या मंत्रिपदाचीही मागणी केलीय. 

पटोले विधानसभा अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यास आणि विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहिल्यास पटोलेंच्या जागी पृथ्वीराज चव्हाण, के. सी. पडवी, आणि यशोमती ठाकूर यांच्यापैकी एका नेत्याची विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते. तर अध्यक्षपद शिवसेनेला देऊन त्या बदल्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यास बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते.

मात्र या प्रस्तावाबाबत अनभिज्ञ असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलीय. 

या सगळ्या शक्यतांची जरी राजकीय वर्तुळात चर्चा होत असली तरीही या प्रस्तावावर निर्णय घ्यायचा झाल्यास महाविकास आघाडीला तो एकत्रितपणे घ्यावा लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देणार का हे पाहणं महत्वाचं असेल..ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही


संबंधित बातम्या

Saam TV Live