काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चहाचे वाटप करत जल्लोष केला

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चहाचे वाटप करत जल्लोष  केला

नवी दिल्लीः मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सत्तेला काँग्रेसने जोरदार धक्का दिल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चहाचे वाटप करत जल्लोष सुरू केला आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी कार्यकर्त्यांना चहाचे वाटप केले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका चहा वाल्याने काँग्रेसला धक्का दिल्याचे लोकसभा निवडणूकीवेळी बोलले जात होते. मात्र, आज भाजपला काँग्रेसने धक्का दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते चहाचे वाटप करून जल्लोष करत असल्याचे ठिकठिकाणी पहायला मिळत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते चहाचे वाटप करून एकप्रकारे मोदींना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.

मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये चुरस सुरू आहे, तर राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पूर्ण वर्चस्व राखत भाजपची सत्ता हिसकावून घेतली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Web Title: Congress leader and Ashok Gehlot serving tea to Congress workers

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com