नांदेड जिल्हा बँकेवर अशोक चव्हाणांचा वरचष्मा

Ashok Chavan
Ashok Chavan

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Bank) निवडणुकीचे गेल्या महिनाभरापासूनच जिल्ह्यात चांगले वातावरण पेटले होते. यात महाविकास आघाडीनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.  भाजप प्रणित पॅनेलचा अक्षरश:धुव्वा उडवला. Congress Leader Ashok Chavan Dominates Nanded District Bank Election

21 पैकी ३ जागा बिनविरोध आल्याने 18 जागेसाठी झालेल्या निवडणुकीची काल मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यात महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार विकास पॅनलला 17 तर भाजपच्या सहकार विकास पॅनलला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. 

पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेच्या (ShivSena) महाविकास आघाडीने आणि भाजप (BJP) खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक चुरशीची ठरेल असे  भाकित अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले होते. Congress Leader Ashok Chavan Dominates Nanded District Bank Election

मात्र, हे भाकित खोटे ठरवत काँग्रेस चे 12, राष्ट्रवादीचे ४ आणि शिवसेनेचा १ असे महाविकास आघाडीचे 17 तर भाजपचे स्वत: खासदार प्रताप पाटील चिखलीकर, पुत्र प्रविण पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि कैलास गोरठेकर या ४ जणांना विजय मिळविता आला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर वर्चस्व सिध्द केले आहे. 

Edited By - Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com