दिलीपकुमार सानंदा यांची निवडणूक रिंगणातून माघार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मतदार संघातून 15 वर्षे आमदार राहिलेले काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा यांनी ऐनवेळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. तसे पत्रक त्यांनी काढले असून ईव्हीएमवर  शंका असल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीं आणि  प्रदेशाध्यक्षांना कळविला असल्याचे जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची खामगाव मतदार संघात पीछेहाट झाल्यावर दिलीपकुमार सानंदा हे बॅकफूटवर आले होते. ते निवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याची चर्चा होती. गेल्या आठवडाभर सानंदा यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली. त्यांनी खामगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला; मात्र तेच मेळाव्याला हजर राहिले नसल्याने सानंदा लढणार नाहीत असे चित्र तयार झाले होते.

दरम्यान आता त्यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली असून निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात यांना  लेखी पत्र देऊन महिन्यांपूर्वीच  निवडणूक न लढण्याची कल्पना दिल्याचे या पत्रकात नमूद आहे. ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत निवडणूक लढत नसल्याचे दिलीपकुमार सानंदा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा हा निर्णय कार्यकर्ते व चाहत्यांना धक्का देणारा आहे.

Web Title: Congress leader DilipKumar Sananda not contest election

संबंधित बातम्या

Saam TV Live