'प्राण जाये पर पाणी ना जाए' प्रणिती शिंदेंचा हट्ट ...(पहा व्हिडिओ)

Praniti Shinde Aggresive over Ujani Water
Praniti Shinde Aggresive over Ujani Water

सोलापूर : उजनी Ujani Dam धरणातील पाणी प्रश्न सध्या चांगलंच पेटल्याच पहायला मिळतो आहे. काँग्रेस Congress प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे Praniti Shinde यांनी सोलापूरच्या हक्काचं उजनीच्या पाण्यासाठी 'प्राण जाए पर पाणी न जाए' असा हट्ट धरला आहे.Congress Leader Praniti Shinde Aggressive over Ujani Water issue

येत्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सोलापूरवासियांना Solapur एका दिवसाआड पाणी मिळावं अशी आग्रही भूमिका प्रणिती शिंदे यांनी घेतलीय. दरम्यान उजनीच्या पाण्याची गळती होत असल्याचे समोर आलं आहे, त्यामुळे येत्या एक महिन्यात उजनीच्या गळतीची दुरुस्ती ताबडतोब करून सोलापूरकरांना हक्काचं पाणी मिळलं पाहिजे,  आणि कुठला अधिकारी यामध्ये हलगर्जीपणा करत असेल तर त्यावर कडक  कारवाई व्हावी अशी मागणी प्रणिती शिंदेंनी केलीय. 

दरम्यान कांही दिवसांपासून सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे Dattatray Bhajane यांनी सोलापूरच्या हक्काचं ५ टी एम सी पाणी इंदापूरला Indapur पळवल्याचा आरोप  होत आहे. त्याअनुषंगाने प्रणिती शिंदे यांनी आज घेतलेली भूमिका महत्वाची असणार आहे. Congress Leader Praniti Shinde Aggressive over Ujani Water issue

उजनी धरणातील पाणी वाटपावरून आधीच मराठवाडा विरुद्ध सोलापूर यांच्यात रणकंदन सुरू असतानाच, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍याला देण्याची प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्यावरुन वाद पेटला. त्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. उजनी पाणी प्रश्नावरून सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी राष्ट्रवादीचे नेते व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर काही दिवसांपूर्वी जोरदार निशाणा साधला होता.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com