काँग्रेसच्या हातून जाणार यूपीएचं अध्यक्षपद? युपीएचं नेतृत्व करण्याची शरद पवारांना गळ

साम टीव्ही
रविवार, 21 मार्च 2021

काँग्रेसच्या हातून जाणार यूपीएचं अध्यक्षपद?
युपीएचं नेतृत्व करण्याची शरद पवारांना गळ
पाच राज्यांच्या निकालानंतर निर्णय होणार

 

 

 

काँग्रेसच्या नेतृत्व निवडीचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. कधी नव्हे ते यंदा गांधी परिवाराच्या हातातून काँग्रेसचं नेतृत्व बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यातच युपीएचं अध्यक्षपदही काँग्रेसकडून निसटण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी होतेय. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर ही मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. शिवसेनेने तर थेटच ही मागणी केलीय.

येत्या जूनमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. मात्र काँग्रेसच्या 23 नेत्यांनी थेट गांधी कुटुंबालाच आव्हान दिल्याने यावेळी काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेसला गांधी घराण्याऐवजी नवं नेतृत्व मिळाल्यास 2024 च्या निवडणुकीत भाजपला तगडं आव्हान मिळू शकतं. कदाचित सत्तेत जाण्याचा मार्ग सोपा होऊ शकतो, असं काँग्रेसच्या मित्र पक्षांना वाटतंय. त्यामुळे गांधी घराण्यातील व्यक्ती विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्यांना या पक्षांकडून बळ दिलं जाऊ शकतं. 

यूपीएमध्ये सध्या 11 पक्ष आहेत. त्यात 9 प्रादेशिक पक्षांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन राष्ट्रीय पक्षांचा समावेश आहे. यापुढे कदाचित शिवसेनेचाही यूपीएमध्ये समावेश होऊ शकतो. गेल्या 17 वर्षांपासून सोनिया गांधींकडे यूपीएचं अध्यक्षपद आहे.

मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता येत्या काळात काँग्रेसला युपीएतून आव्हान दिलं जाऊ शकतं. 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live