काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

 

कराड : सातारा जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसला यापूर्वीच मोठे खिंडार पडलेले आहे. अद्यापही सभापती रामराजे निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले यांची आगामी दिशा स्पष्ट झालेली नाही. या पाश्र्वभूमीवर आता काँग्रेसलाही गळती लागली आहे.

 

कराड : सातारा जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसला यापूर्वीच मोठे खिंडार पडलेले आहे. अद्यापही सभापती रामराजे निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले यांची आगामी दिशा स्पष्ट झालेली नाही. या पाश्र्वभूमीवर आता काँग्रेसलाही गळती लागली आहे.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, आमदार आनंदराव पाटील यांनी आज स्वपक्षावरच टीका करत पक्ष सोडण्याचे संकेत दिले. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतलेले पाटील कार्यकर्त्यांसह भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पाटील यांनी आज स्वपक्षाबरोबरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. मला पक्षातून बाजूला करण्याचे कारस्थान सुरू असल्याचे लक्षात आल्याने कार्यकर्त्यांशी बोलून लवकरच आगामी वाटचाल स्पष्ट करू असे त्यांनी सांगितले. पाटील यांच्या या निर्णयाने ‘कराड दक्षिण’ मतदारसंघातील पृथ्वीराज चव्हाण यांची लढत आता त्यांना आणखी अवघड बनली आहे.

 राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसलाही मोठे खिंडार पडल्याचे आता उघड झाले आहे. पाटील यांचा हा संभाव्य भाजपप्रवेश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. किसनवीरचे अध्यक्ष, माजी आमदार मदन भोसले, माण-खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे, ‘कराड उत्तर’चे धर्यशील कदम यांच्या पाठोपाठ माजी जिल्हाध्यक्ष, आमदार आनंदराव पाटील यांनीही पक्षाची साथ सोडण्याचा निर्धार केल्याने काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे..

पाटील हे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याकामी भाजपचे प्रदेश चिटणीस व कराड दक्षिणचे संभाव्य उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यांच्यासमवेत पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असून लवकरच ते भाजापात प्रवेश करतील असे सांगण्यात येत आहे.

Web Title: Congress Mla Anandrao Patil Likely To Join Bjp


संबंधित बातम्या

Saam TV Live