दोन महिने मे...बंद हो जायेगा... चायवाले का ड्रामा: अशोक चव्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 मार्च 2019

धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसची राज्यासह धुळे मतदारसंघात पहिली विराट सभा राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (शुक्रवार) येथील "एसएसव्हीपीएस' महाविद्यालयाच्या मैदानावर झाली. त्यावेळी भाषणात चारोळी स्वरूपाच्या उपरोधिक टीकेतून प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी मोदी व फडणवीस सरकारवर टोलेबाजी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून "दोन महिने मे.. बंद हो जायेगा...चायवाले का ड्रामा', अशी टीका अशोकरावांनी केल्यानंतर जनसमुदायातील कार्यकर्त्यांनी शिट्ट्या, टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

सभेतील भाषणात केंद्र, राज्यातील भाजप सरकारच्या धोरणांवर टीका करताना चव्हाण यांनी उपरोधिक घोषणांचा आधार घेतला. भाजप सरकारच्या विविध घोषणांचा संदर्भ देत "आपलं सरकार आणि घोषणा दमदार', छत्तीसगड- राजस्थान- मध्य प्रदेशमधील सत्ताबदलाचा संदर्भ घेत "रमण गये.. महाराणी भी गई.. चले गये शिवराज मामा...दो महिने में... बंद हो जायेगा चायवाले का ड्रामा...'सरकारकडे पैसे नसल्याचा संदर्भ घेत "देशात नरेंद्र- राज्यात देवेंद्र-मंत्रालयात उंदरं आणि तुम्हाला दारिद्य्र...',महिलांवरील अत्याचाराचा संदर्भ घेत बेटी बचाओ-बेटी पढाओ नाही तर "भाजपवालोंसे बेटी बचाओ...', खोट्या आश्‍वासनांचा संदर्भ घेत "नरेंद्र एकपट- देवेंद्र दुप्पट आणि उद्योगधंदे व अर्थव्यवस्था चौपट...' अशी खुमासदार टीका चव्हाण यांनी केली. यातून त्यांनी उपस्थितांची मने जिंकल्याने टाळ्यांचा कडकडाटही झाला. 

Web Title: Congress MP Ashok Chavan attacked Narendra Modi

संबंधित बातम्या

Saam TV Live