काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात: अशोक चव्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 डिसेंबर 2018

अमरावती : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून, आघाडीसाठी काँग्रेस सकारात्मक आहे. तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आघाडीचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. विदर्भात काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला सुरवात झाली असून, आज (बुधवार) ही यात्रा अमरावतीमध्ये पोचली आहे. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्याने काँग्रेस पक्षाचे सर्व  ज्येष्ठ नेते अमरावतीत दाखल झाले आहेत.  

अशोक चव्हाण म्हणाले, की प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आमची बोलणी सुरु आहे. मात्र एमआयएम हा आमच्यासाठी अडचणीचा मुद्दा असल्याने त्यांना आघाडीमध्ये घेणार नाही. राज्यात पडलेल्या दुष्काळासंदर्भात केंद्राची टीम सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. या संदर्भात केंद्राचा राज्य सरकारवर विश्वास नाही. हा पाहणी दौरा हा केवळ फार्स आहे.  आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस नेतृत्वाला हैराण करणे हा एकमेव उद्योग सध्या भाजप करीत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी नॅशनल हेरॉल्डसह अनेक प्रकरणं उकरून काढली जात आहेत, तर नेत्यांचे फोन टॅप करण्यासारखे प्रकार देखील केल्या जात आहेत तर सर्व संवैधानिक संस्था आज अडचणीत असल्याचेही ते म्हणाले. 

भाजप वाल्यांच कुत्रं तरी मेल का?
महात्मा गांधींचे नाव घेण्याचे काम भाजप करत आहे. महात्मा गांधीचे नाव घेण्याचा अधिकार भाजपल्यांना अजिबात नाही. काँग्रेसने महात्मा गांधींच्या अहिंसेचे मार्गातून इंग्रजांना पिटाळून लावले. जनसमुदाय एकत्र करून आंदोलन उभे केले. हे काम करतात अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी बलिदान दिले. या भाजप वाल्याच कुठलं योगदान आहे. यांच्या घरच एक कुत्रं मेल म्हणून योगदान आहे का म्हणत चांगलीच बोचरी टीका अशोक चव्हाण यांनी केली.

Web Title: Congress MP Ashok Chavan talked about Congress NCP alliance

संबंधित बातम्या

Saam TV Live