Breaking काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यात निधन

साम टिव्ही ब्युरो
रविवार, 16 मे 2021

गेले काही दिवस पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले नेते राजीव सातव Rajiv Satav यांचे आज सकाळी पुण्यात कोरोनाने निधन झाले

पुणे : गेले काही दिवस पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले नेते राजीव सातव Rajiv Satav यांचे आज सकाळी पुण्यात कोरोनाने निधन झाले. २३ एप्रीलपासून ते पुण्यात Pune  उपचार घेत होते. काँग्रेसचे Congress प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. Congress MP Rajiv Satav Passes Away in Pune

19 एप्रिलला सातव यांना कोरोनाची Corona लक्षणे दिसून आली होती. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. 25 तारखेला त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 

राजीव सातव  यांची तब्बेत नाजुक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो cytomegalovirus हा नवा व्हायरस सापडल्याची माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. आज सकाळी टोपे सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्याकडे निघाले. मात्र, ते पुण्यात पोहोचण्यापूर्वीच सातव यांचे निधन झाले. Congress MP Rajiv Satav Passes Away in Pune
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live