''कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसची राज्यात सत्ता आली आणि धान्य खरेदी थांबली''

अभिजीत घोरमारे
गुरुवार, 27 मे 2021

कॉग्रेस-राष्ट्रवादीची (Congress-NCP) राज्यात सत्ता आली की धान्य खरेदी थांबली.

कॉग्रेस-राष्ट्रवादीची (Congress-NCP) राज्यात सत्ता आली की धान्य खरेदी थांबली.  असा खळबळ जनक आरोप माजी सामाजिक न्याय मंत्री व  भाजप नेते राजकुमार बड़ोले यांनी केला असून गोंदियात जिल्ह्यात भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले असतांना त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यावर्षी खरेदी करण्यात आलेल्या खरीप हंगामाचा आधारभूत धान खरेदी केंदावर धुळखात पडून असून रब्बी हंगामाचा धान खरेदी प्रक्रिया थांबली असल्याने अद्याप एक क्विटल ही धानाची खरेदी न झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्याची धान खरेदी केंद्रवर पायपिट सुरु आहे.("Congress-NCP came to power in the state and stopped buying foodgrains.")

 हे देखील पाहा 

त्यामुळे तात्काळ धान खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे या मागणीला घेऊन आज गोंदियात जिल्हात भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले आह. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले असून माजी मंत्री परिणय फुके यांच्या सह आजी माजी आमदार उपस्थित होते. तर येत्या 10 जून पर्यंत धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही तर या पॆक्षा तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा भाजप तर्फे देण्यात आला आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live