राष्ट्रवादी आणि काँग्रेस आता प्रत्येकी 20-20 जागा लढवणार असल्याची चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

मुंबई- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आता लोकसभा निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला ठरला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आता प्रत्येकी 20-20 जागा लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली यातून दिसत आहे.

युती आणि आघाड्यांच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रत्येकी 20-20 जागा लढवण्यावर जवळपास एकमत झालं असल्याचे बोलले जात आहे. तसेच, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 8 जागा सोडण्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं जवळपास निश्चित करण्यात आल्यचेही सांगण्यात येत आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला चार जागा काँग्रेस आणि चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याच्या सोडण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे 12 जागांची मागणी केली होती. महाराष्ट्राचा भौगोलिक आणि सामाजिक इतिहास हा गरीब मराठा, आदिवासी, ओबीसी, दलित, बहुजन, मुस्लिम, धनगर समाजांची मोट बांधून सत्तेच्या टापूला धक्का देणारा आहे. हा वंचित समाज निर्णायक ठरू शकतो, याची पुरेपूर कल्पना अ‍ॅड. आंबेडकर यांना आहे, म्हणूनच ते 12 जागांवर अडून बसले आहेत असे सांगण्यात येत आहे.

Web Title: Congress NCPs mission will be T20 Prakash Ambedkars entry In alliance

संबंधित बातम्या

Saam TV Live