सतत मास्क लावणं हानिकारक! त्यामुळे, नव्या आजाराची भीती

साम टीव्ही
सोमवार, 18 मे 2020
  • सतत मास्क लावल्यामुळे नव्या आजाराची भीती
  • मास्कमुळे उत्सर्जित केलेला कार्बनडायऑक्साईड पुन्हा शरीरात 
  • ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो हायपोक्सिया?
  • काय आहे व्हायरल पोस्टमागचं सत्य ?

कोरोनाच्या संकटामुळे सध्या आपण तोंडाला सतत मास्क लावून असतो. एकाअर्थी ते चांगलंच आहे. पण आता सतत मास्क लावल्यामुळे तुम्हाला इतर आजार होऊ शकतात असा दावा केला जातोय. तशा पोस्टही सध्या व्हायरल होतायेत. साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केलाय.

सध्या आपण सारेज जण कोरोनाच्या संकटाशी झुंजतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करतोय. सध्याच्या घडीला मास्क लावणं आपल्या आणि इतरांच्या हिताचंच आहे. पण एका पोस्टनं सर्वांची चिंता वाढलीय. 

या पोस्टमध्ये काय दावा केलाय पाहा

जास्तवेळ मास्कचा वापर केल्यानं बाहेर सोडलेला कार्बन डायऑक्सिइड श्वासाद्वारे पुन्हा आतमध्ये जातो. त्यामुळे हायपोक्सिया होऊ शकतो. संपूर्ण मानवी शरीर किंवा शरीरातील एका भागात पुरेसं ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे आपल्याला चक्कर येण्यास सुरुवात होते. 

सध्याच्या घडीला मास्क अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे सततर मास्क लावल्यामुळे हायपोक्सिया होऊ शकतो का? या पोस्टमुळे जो दावा केलाय तो खरा आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. मुळात हा लेख नायजेरियन वेबसाईट वॅनगार्डवर पोस्ट करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर इंग्रजी वृत्तसमूहाच्या अँटी फेक न्यूज वॉर रुमनं हा दावा दिशाभूल करणार असल्याचं म्हंटलंय. या दाव्याची सतत्या जाणून घेण्यासासाठी आमचे अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटले तेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हीच पाहा.....
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तोंडाला मास्क लावणं हानीकारक नाही. हा मास्क व्यवस्थित लावला गेलाय की नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

तोंडाला सतत मास्क लावल्यानं हायपोक्सिया होत नाही. 

मास्क योग्यरित्या लावलेला नसल्यास डोकेदुखी किंवा डोळ्यांवर ताण येऊ शकतो

एकंदरीतच सतत तोंडाला मास्क लावल्यामुळे कार्बनडायऑक्साईड शरीरात जाऊन तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा इतर आजार होऊ शकतात हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. त्यामुळे तुम्ही असा पोस्टवर विश्वास ठेवू नका...शंका असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या...
 


संबंधित बातम्या

Saam TV Live