नंदुरबार, शासकीय ग्रामीण रुग्णालयात अलगीकरण कक्षाच्या निर्मितीचे कार्य प्रगतीपथावर  

दिनू गावित
गुरुवार, 22 एप्रिल 2021

कोरोना बाधितांच्या उपचारासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या  ठिकाणी पंधरा खाटांचे  अलगीकरण कक्ष  स्थापन करण्याचे काम प्रगतीपथावर असून ग्रामीण भागातील नागरिकांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपचाराची सोय होणार

नंदुरबार -  जिल्ह्यात कोरोना Corona बाधितांच्या उपचारासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या Hospital  ठिकाणी पंधरा खाटांचे  Bed अलगीकरण कक्ष  Isolation Ward स्थापन करण्याचे काम प्रगतीपथावर असून ग्रामीण भागातील नागरिकांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपचाराची सोय होणार आहे.  कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनातर्फे गावपातळीवर उपचारांची सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात सुविधा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होईल, असे अति. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते K.D. Satpute यांनी सांगितले. Construction work of isolation ward at Government Rural Hospital Nandurbar is in progress

प्रशसनातर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनची Oxygen सुविधा असणाऱ्या आणखी 100 खाटांचे केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी ऑक्सिजन  यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात आहे. खाटांची सोयदेखील करण्यात आली आहे. लवकरच या केंद्रातही रुग्णांवर उपचार सुरू करण्यात येणार आहे. नाशिक विभागातील जिल्हा रुग्णालयात 350 ऑक्सिजन खाटांच्या सहाय्याने एकाचवेळी कोरोना बाधितांना उपचाराची सुविधा देणारा नंदुरबार हा एकमात्र जिल्हा आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी दिली.

Edited By -  Shivani Tichkule 


संबंधित बातम्या

Saam TV Live