अभिनेता ते नेता बनलेले कमल हसन यांचं वादग्रस्त वक्तव्य

अभिनेता ते नेता बनलेले कमल हसन यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : अभिनेता ते नेता बनलेले कमल हसन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात अनेकांनी मिडीयामार्फत प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ज्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या या दहशतवादी हल्ल्याला व दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या प्रतिक्रियाही आल्यात. ज्यांचा देशभरात तीव्र स्तरावर निषेध व्यक्त झाला. असे असतानाही कमल हसन यांनी असेच वादग्रस्त शब्द उच्चारले आहेत.

रविवारी चेन्नईतील एका कार्यक्रमात कमल हसन यांना पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या मृत्यूवर मत विचारले असता त्यांनी सरकारवर तोफ डागळली. हसन म्हणाले, 'भारत सरकार काश्मीर मध्ये जनमत चाचणी का घेत नाही? सरकारला कुणाची भीती वाटते?' भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील नेत्यांना आताच्या परिस्थितीला जबाबदार ठरवत हसन म्हणाले, 'जर दोन्ही देशातील राजकीय नेत्यांनी योग्य निर्णय घेतले असते, योग्य वागले असते तर एकही सैनिक हुतात्मा झाला नसता. जनमत चाचणी करा आणि लोकांशी बोला. त्यांनी सरकारला का निवडले नाही? त्यांना कशाची भीती वाटते? त्यांना राष्ट्राचे विभाजन करायचे आहे का?'

हसन पुढे म्हणाले, 'मला या गोष्टीची पश्चाताप होतो की 
जेव्हा लोक बोलतात की सेनेचे लोक काश्मीरमध्ये मरायला जात आहेत. त्यामुळे भांडण बंद करा. गेल्या 10 वर्षात आपल्या सभ्यतेने हेच शिकवले आहे का? सैनिक का मरायला पाहिजेत? दोन देशातील भांडणं थांबवलीत तर नियंत्रण रेषा नियंत्रणात राहील, पण सीमेवर नेहमीच नियमांचे उल्लंघन केले जात आहे.'

Web Title: actor and political leader kamal haasan reacts on pulwama terror attack

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com