संभाजी भिडे म्हणतात....कोरोनाच अस्तित्वात नाही, मग मास्क कशाला लावता?

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

संभाजी भिडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना काही विधाने केली आहेत. ते म्हणाले की, कोरोना हा रोग मुळात अस्तित्वाचं नाही. अस्तित्वात नसलेले काळे मांजर काळ्या कूट अंधारात शोधण्यासारखे कोरोना रोगाचा प्रकार आहे.

सांगली : संभाजी भिडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना काही विधाने केली आहेत. ते म्हणाले की, कोरोना Corona हा रोगच मुळात अस्तित्वाचं नाही. अस्तित्वात नसलेले काळे मांजर काळ्या कूट अंधारात शोधण्यासारखे कोरोना रोगाचा प्रकार आहे.  कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे...अशी विधाने करत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.

देशात आणि महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Corona)  सगळीकडे आपले अस्तित्व वाढवत आहे. त्यामुळे दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या सुविधा देणे आता शासनाला Mahrashtra जमेनासे झाले आहे. आरोग्यसेवा देताना शासन जमेल तेवढे प्रयत्न करत आहे. कोरोना रुग्णसंख्या तर वाढत आहे पण सोबतच मृत्यूदर वाढण्याची भीती सुद्धा आहेच. या सर्वातच शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. सामान्य जनता सरकारविरोधी बंड सुद्धा पुकारू शकते असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. Controversial statement of Sambhaji Bhide Guruji of Shiv Pratishthan on Corona

प्रत्येकाला जीवाची काळजी जो तो घेईल. सरकारने यात आपले लक्ष घालू नये. कोरोनामुळे जी माणसे मारत आहेत ती माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत असे  देखील ते म्हणाले. तुम्ही या कोरोनाला कमी करण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) लावत आहात ही अत्यंत चुकीची बाब आहे. लॉक डाऊन लावण्यासारखे उपाय करणे म्हणजे कवडीमोल  अक्कल नसल्यासारखे आहे, अशीही वक्तव्ये त्यांनी केली

''सरकारने पारदर्शक कारभार करावा. राज्यात लॉकडाऊनची काही एक गरज नाही. व्यसने वाढवायचे गांजा, मटका अफू सगळे मोकाट सुटले आहेत पण तालमी, मैदाने मात्र बंद केली आहेत. लॉकडाऊन Lock Down सुरु आहे. पण आमदार खासदार यांचे पगार सुरु आहेत. त्यांच्याकडील पैसे परत घ्यावे आणि सरकारी खात्यात जमा करावेत. सामान्य माणसाचे विचार तुम्ही करत नाही. अश्या निर्दयी सरकारला देशातून फेकून दिले पाहिजे,'' असेही ते म्हणाले. Controversial statement of Sambhaji Bhide Guruji of Shiv Pratishthan on Corona

''कोणत्याही नालायकाने मास्क घालण्याचे सिद्धांत काढला आहे ? मास्क लावण्याची गरज नाही. कोरोनाच्या नावाखाली देशात राज्यात खेळखंडोबा चालू आहे.  कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून तुम्ही राज्य केले पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील. कोरोना-कोरोना आक्रोश चालला आहे.  केंद्र संरकार आणि राज्यसरकार या लॉक डाऊन मुले होण्यारी उपासमार आणि लोकांच्या झालेल्या वाईट अवस्थेला कारणीभूत आहे.''  मास्क लावून तुम्ही मिलटरी (Military )मध्ये लढायला जाणार आहेत का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live