धोका पत्करून उरीसेक्टरमध्ये कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू

Uri covid 19  Vaccination.jpg
Uri covid 19 Vaccination.jpg

वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या Pakistan  सीमेला Border  लागून असलेल्या बारामुल्ला Baramulla  जिल्ह्यातील उरी Uri  अनेक कारणांमुळे चर्चेत असते. या सीमा भागात गोळीबार आणि घुसखोरीच्या बातम्या तर नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र हाच बारामुल्ला जिल्हा आता एक वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.  तो म्हणजे लसीकरणासाठी. भारतीय लष्कराचे Indian Army  जवान आणि वैद्यकीय पथक Medical Squad कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी आता बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळील बोनियार गावात Boniar village पोहचले आहेत. या भागात जाण्यासाठी ते पायी प्रवास करत आहेत. (Corona 19 preventive vaccination campaign launched in Uri sector at risk) 

देशभरात जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. मात्र आता भारताच्या सीमेलगतच्या गावातही लसीकरण सुरू झाले आहे. विशेष म्हणजे लसीकरणासाठी उरीच्या बोनियारमध्ये आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन प्रत्येक गावातील लोकांना घरोघरी जाऊन लस देण्याचे काम केले आहे. या भागातील बरीच गावे दूरवर पसरलेली आहेत आणि काही गावे सीमेला लागूनच आहेत.  त्यामुळे या भागातील लोक लसीकरणांपासून वंचित राहण्याचा धोका आहे. ही गावे पाकिस्तानी सैन्याच्या पोस्ट आणि कॅम्पच्या निशान्यावर असल्याने या गावांमध्ये  लष्करामार्फत लसीकरण मोहीम राबवली जात आहे. 

दोन्ही देशांमध्ये सध्या युद्धबंदी लागू लरण्यात आली आहे. गोळीबार थांबला आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. म्हणून आम्ही लोकांना सहज लस देऊ शकतो.  असे एक लसीकरण सदस्याने म्हटले आहे. बोनीयारचे ब्लॉक वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज मसूदी  यांनी म्हटले आहे की, त्यांच्या भागातील बहुतेक गावे इतक्या दूर आहेत की ते रुग्णालयात येऊ शकत नाहीत किंवा कोरोना लसीकरणासाठी लसीकरण शिबिरात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने या गावांसाठी विशेष पथक स्थापन करून घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. या गावात मोबाइल सेवा फारच कमी प्रमाणात  उपलब्ध आहे आणि इंटरनेटबाबत तर  बोलणेच चुकीचे आहे. अशा परिस्थितीत आशा कामगार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना इथल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु प्रशासनाने ही विशेष मोहीम सुरू केली असून या गावांमध्ये 80% लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

तर कोरोना लसीकरणाच्या या विशेष मोहिमेचे स्थानिक लोकांनी कौतुक केले. आजपर्यंत प्रशासन किंवा आरोग्य विभागातील लोक आमच्या भागात अशा कारणासाठी आले, असे  कधीही झाले नाही. पण जर  प्रशासनाने  लसीकरणासाठी इतका धोका पत्करला आहे तर आता नागरिकांनीही लवकरात लवकर लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. असे बोनीयार गावचे सरपंच रफी अहमद  यांनी म्हटले आहे. दरम्यान या ठिकाणी  येत्या दोन आठवड्यांत सुमारे 100-120 गावात 18 ते 44  वयोगटातील आणि 45+ वयोगटातील सर्व लोकांचे लसीकरण केले जाईल. हे गट उच्च जोखीम गटात मोडतात आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रशासनाने 30 जूनपर्यंत 18 ते 44 वर्षांच्या श्रेणीत 45+ आणि 100 टक्के लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Edited By- Anuradha Dhawade 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com