कोरोना करतोय माणसाच्या मेंदूवर परिणाम? कोरोना रूग्ण बनतायेत मनोरूग्ण ?

साम टीव्ही
शुक्रवार, 10 जुलै 2020
  • कोरोना करतोय माणसाच्या मेंदूवर परिणाम ?
  • कोरोना रूग्ण बनतायेत मनोरूग्ण ?
  • लंडनच्या वैज्ञानिकांचा नवा दावा 

कोरोनानं आता माईंड गेम खेळायला सुरूवात केलीय. आतापर्यंत फुफ्फुसांवर परिणाम करणारा कोरोना आता मेंदूवरही परिणाम करतोय. कुणी केलाय हा दावा आणि कोरोनामुळे नेमकं काय होतंय. वाचा...

आतापर्यंत कोरोना हा माणसाच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो हे आपण ऐकत आलोय. पण आता कोरोना माणसाच्या मेंदूवरही परिणाम करतोय अशी धक्कादायक माहिती पुढे आलीय. कोरोना विषाणू माणसाच्या नर्वस सिस्टवर परिणाम करतो. त्यामुळे माणसं असंबंद्ध बोलू लागतात. ते सतत विचारमग्न राहतात असा दावा करण्यात आलाय. लंडनच्या संशोधकांनी हा धक्कादायक दावा केलाय. 

लंडन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 43 रूग्णांचा अभ्यास करून हा अहवाल मांडलाय. या रूग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की  कोरोना बाधित रूग्णांच्या मेंदूतील नसांना सूज येऊ लागलीय त्यामुळे मनोविकार वाढू लागलाय. बरेचसे रूग्ण विचारमग्न राहत असून असंबद्ध बोलू लागले आहेत. 

लंडन युनिव्हर्सिटीतील संशोधक माइकल जँडी यांनी हा मनोविकार 1920 आणि 1930 मध्ये पसरलेल्या इंफ्लूएंजा फ्लू सारखा असल्याचं म्हंटलंय. तर कॅनडाच्या वेस्टर्न युनिव्हर्सिटीतील संशोधक ऍड्रीयन ओवेन यांनी कोरोनामुळे वर्षभरात लोक अनेक आजारांना सामोरं जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केलीय. संशोधकांचे दावे धक्कादायक असले तरी सध्याच्या घडीला त्याकडे दुर्लक्ष करून चालता येणार नाही. 


संबंधित बातम्या

Saam TV Live