'हे' महाशय म्हणतात कोरोनालाही जगण्याचा अधिकार आहे

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 14 मे 2021

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी एक विचित्र विधान केले आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी गुरुवारी सांगितले की कोरोना व्हायरस हा एक जिवंत प्राणी आहे, ज्याला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांचे हे विधान सध्या  सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे आणि लोक त्यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत.

देशात  कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. यंदा महाराष्ट्रात Maharashtra तर कोरोनाने कहर केला असून उपचारा अभावी अनेक लोकांचा मृत्यू Death होत आहे. या कोरोनाने सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने Government कडक निर्बंध लावले आहेत. रोज देशात शेकडो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. Corona also has the right to live

त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असे असतानाच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे Uttrakhand माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत trivendra singh rawat यांनी एक विचित्र विधान केले आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी गुरुवारी सांगितले की कोरोना व्हायरस Corona Virus हा एक जिवंत प्राणी आहे, ज्याला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांचे हे विधान सध्या  सोशल मीडियावर Social Media चांगलेच व्हायरल होत आहे आणि लोक त्यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत.

हे देखील पहा -

आपण मानव कोरोना पेक्षा स्वत:ला बुद्धिमान समजतोय आणि त्याला नष्ट करायला निघालो आहोत. त्यामुळेच कोरोना व्हायरस वारंवार स्वत:ला बदलत आहे, असं त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले आहे. आपल्या जर सुरक्षित राहायचे असेल तर त्याने व्हायरसच्या पुढे निघून गेलं पाहिजे, असेही ते म्हणाले. त्यांच्या या अजब-गजब वक्तव्यावर प्रचंड टीका होत असून रावत यांना ट्रोल केलं जात आहे. Corona also has the right to live

चिखलीतील खाजगी कोविड रुग्णालयाच्या 13 डॉक्टरांनी दिले सामूहिक राजीनामे

दरम्यान, भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २,४०,४६,८०९ वर जाऊन पोहोचला आहे. तर २,६२,३१७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . तर आतापर्यंतदेशात २,००,७९,५९९ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३७,०४,८९३  इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत भारतात नव्याने 343,144 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४००० रुग्णांचा मृत्यू झाला असून ३,४४,७७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live