भयंकर! कोणताही आजार नसलेल्यांचाही कोरोनामुळे होतोय मृत्यू

साम टीव्ही
रविवार, 3 मे 2020
 •  
 • प्रकृतीच्या समस्या नसलेल्यांच्या मृत्यूमध्ये वाढ!
 • कोणताही पूर्व-आजार नसलेले रुग्ण ठरतायंत कोरोनाचे बळी
 • मृत्यू विश्लेषणातून धक्कादायक माहिती उघड

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एखादा दुर्धर आजार असल्याचं दिसून येतंय. पण ज्यांना कोणताही आजार नाही, अशांचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.

करोनामुळे मरण पावणाऱ्यांमध्ये कालपर्यंत प्रामुख्यानं वयो-वृद्ध मंडळी तसंच ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदींचा त्रास होता अशांचा समावेश होता. मात्र गेल्या दोन आठवड्यातील मृत्यूंचा आढावा घेतल्यास आरोग्याचे कोणतेही प्रश्न नसलेल्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं दिसतंय.

 • दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या १७८ मृत्यूमध्ये कोमॉर्बिडीटी नसलेल्यांचे प्रमाण १९ टक्के एवढे होतं. 
 • ते आता वाढल्याचं दिसत आहे. 
 • वैद्यकीय शिक्षण विभागाने करोनाच्या ४४७ मृतांचे विश्लेषण केलं. 
 • त्यात २६ टक्के मृत्यू पावलेल्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब, श्ससनविकार तसेच ह्रदयविकाराचा त्रास नव्हता 
 • इतकंच नाही तर करोनाची लागण होण्यापूर्वी या सर्वांची प्रकृती सामान्य होती.
 • पूर्व आजार नसलेल्याच्या मृत्यूमध्ये १९ टक्यांवरून २६ टक्के एवढी वाढ झालेली दिसून येतेय.
 • आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना कोणतातरी पूर्व आजार प्रामुख्यानं असायचा. पण आता कोरोनामुळे कोणताही दुर्धर किंवा पूर्ण आजार नसलेल्यांचा जीव जायला लागलाय. आधीच फ्रंटलाईनवर कोरोनाशी सामना करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसमोर हे सर्वात खडतर आव्हान आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live