कोरोनाच्या खात्म्यासाठी मोठा धोका, मानवी शरीरात टाकणार कोरोना

साम टीव्ही
शनिवार, 26 सप्टेंबर 2020
  • मानवी शरीरात टाकणार कोरोना
  • कोरोनाच्या खात्म्यासाठी मोठा धोका
  • स्वयंसेवक स्वतःहून संसर्ग करुन घेणार

आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आपण सगळेच जण काळजी घेतोय. पण काही लोक स्वतःहून कोरोनाचा संसर्ग करुन घेण्यासाठी तयार झालेत.  काय आहे यामागचं कारण? आणि हे कुठे घडतंय? पाहुयात या रिपोर्टमधून.

जगभरात कोरोना व्हॅक्सिनसाठी संशोधन सुरु आहे. कोरोनाची लस लवकरात लवकर यावी यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करतोय. अशात ब्रिटनने चॅलेंज ट्रायल्स हाती घेण्याचं ठरवलंय. या अंतर्गत निरोग माणसांच्या शरीरात हेतूपूर्वक कोरोना विषाणू सोडला जाणार आहे. 

काय आहे 'चॅलेंज ट्रायल'?

  • या अंतर्गत स्वयंसेवक स्वतः कोरोना संसर्ग करुन घेणार आहेत 
  • यादरम्यान उपचारासाठी पर्यायांचीही चाचणी होईल 
  • तसंच कोरोना व्हॅक्सिनचा शरीरावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास केला जाईल
  • लंडनमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे 
  • अमेरिकेतील १ डे सूनर ही संस्था यावर काम करतेय
  • पुढील वर्षी जानेवारी महिन्यात या चाचण्या होतील
  • ज्यात जवळपास 2000 स्वयंसेवक भाग घेतील

कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कदाचित स्वयंसेवकांना स्वतःहून कोरोना संसर्ग करुन घ्यावा लागेल. असं बोललं जात होतं. या ट्रायल्सच्या निमित्ताने तेच प्रत्यक्षात होताना दिसतंय. 

कोरोनासारखा भयंकर विषाणू स्वतःहून आपल्या शरीरात येऊ द्यायचा म्हणजे जीविताचा धोका तर आहेच.. पण जगाला या संकटातून तारण्यासाठी कुणाला तरी तो धोका पत्कारावाच लागणार आहे.. आणि त्यासाठीचीच मोहीम आता राबवली जातेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live