CORONA EFFECT | कोरोना बीअरला कोट्यवधींचा तोटा

मयुरेश कडव
रविवार, 15 मार्च 2020

गुगल इमेजेसमध्ये अजूनही कोरोना असं सर्च केल्यानंतर कोरोना बीअरच दिसून येतेय. अनेकांनी सोशल मीडियामध्ये कोरोना वायरस आणि कोरोना एक्स्ट्रा बीअरचा संबंध असल्याच्या अफवा पसरवल्यात.

मॅक्सिको - कोरोनाचं सध्या थैमान सध्या सगळीकडे पाहायला मिळतंय. जागतिक अर्थव्यवस्थेलाही याचा सगळ्यात मोठा फटका बसलाय. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक बळी गेलेत. चीनपाठोपाठ इटली, अमेरिकेतही कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण मोठं आहे. या सगळ्यात महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर आता पाहायला मिळतोय. मात्र अशातच कोरोना नावाच्या एका बीअरला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. 

 

मॅक्सिकम बीअर असलेल्या कोरोना एक्स्ट्रा (Corona beer) या बीअर कंपनीला कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसलाय. नावातील  साधर्म्यामुळे कोरोना एक्स्ट्रा या बीअरला सगळ्यात मोठा तोटा सहन करावा लागलाय. तब्बल 132 मिलिअन पाऊंडचं नुकसान झालंय.  तब्बल 15 टक्क्यांनी या कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागतोय.  गेल्या दोन महिन्यात कोरोना एक्स्ट्रा या बीअरच्या उत्पादनावरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. 

 

गुगल इमेजेसमध्ये अजूनही कोरोना असं सर्च केल्यानंतर कोरोना बीअरच दिसून येतेय. अनेकांनी सोशल मीडियामध्ये कोरोना वायरस आणि कोरोना एक्स्ट्रा बीअरचा संबंध असल्याच्या अफवा पसरवल्यात. मात्र या बीअरचा कोरोना वायरसशी कोणताही संबंध नाही आहे. नावातील साधर्म्यामुळे फक्त कोरोना बीअरचीही लोकांनी धास्ती घेतली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरं जावं लागतंय. आतापर्यंत झालेल्या तोट्यातील हा सर्वात मोठा तोटा मानला जातोय. 

 

कोरोनामुळे फक्त बीअरच नाही, तर सर्वच प्रकारच्या व्यवसायांवर गदा आली आहे. कोरोना एक्स्ट्रा बीअरप्रमाणेच चिकन आणि अंड्यावरही मोठं संकट आलंय. चिकन आणि अंड्यांमुळे कोरोना होतो, अशी अफवा पसरवण्यात आली होती. त्यानंतर पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे येत्या काळात पोल्ट्री व्यवसायालाही पुन्हा एकदा नव्यानं उभारी देण्याचं आव्हान सगळ्या व्यावसायिकांसमोर आलंय. हाच प्रकार कोरोना एक्स्ट्रा बीअरच्या बाबतीतही घडल्याचं दिसून येतंय. 

हेही वाचा - दारुमुळे कोरोनाचा धोका टळतो?

हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी उचललं हे महत्त्वाचं पाऊल

हेही वाचा - तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट तर नाही ना?

पाहा व्हिडीओ - दारु प्यायलाने कोरोना होत नाही? 

 

Corona beer virus covid 19 maxican corona extra beer effect health india china searches google images 2020

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live