बापरे : एप्रिल महिन्यात भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट.....

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्याला महामारीने वेढलंय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे

भंडारा : बापरे !!! भंडारा Bhandara जिल्ह्यात एप्रिल April महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्याला महामारीने वेढलंय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनच्या आव्हान नंतर सुद्धा  नागरिकांची बेफिकिर अंगलट येऊ लागली आहे. सलग १२ दिवसात १२ हजार २०२ रुग्णाची जिल्ह्यात भर पडली आहे.Corona blast in Bhandara district in April

त्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या राज्यातील टॉप टेन Top ten कोरोना बाधित जिल्ह्यात समावेश झाला आहे. सुरुवातीला भंडारा जिल्ह्यात ३१ मार्च पर्यत्न १७ हजार ६४५ रुग्णांची नोंद झाली होती.  मात्र एप्रिल महीना कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला, आणि १२ दिवसात १२ हजार २०२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात दररोज विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे. जिल्ह्याच्या विचार केला असता आता पर्यत्न जिल्ह्यात २९ हजार ८४७ रुग्ण आढळले असून ४३६ कोरोनाने मृत्यु Dead पावले आहे. 

भंडारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनाचे ताण अधिक वाढले आहे. अवघ्या १२ दिवसात १२ हजार २०२ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये १ एप्रिल ७३३ रुग्ण, २ एप्रिल ७९३ रुग्ण, ३ एप्रिल ८४६ रुग्ण, ४ एप्रिल ८४४ रुग्ण, ५ एप्रिल ६५६ रुग्ण, ६ एप्रिल ८६८, रुग्ण, ७ एप्रिल ११७७ रुग्ण, ८ एप्रिल १०४२ रुग्ण, ९ एप्रिल १२१७ रुग्ण, १० एप्रिल ९८४ रुग्ण, ११ एप्रिल १४४६ रुग्ण, १२ एप्रिल १५९६ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. 

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live