मुंबईकरांनो सावधान; कोरोनामुळे आठवड्याभरात झाले १८४ मृत्यू

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गंभीर रुग्णांचा आकडा वाढत असून गेल्या आठवडाभरात १८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे

मुंबई : वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत Mumbai गंभीर रुग्णांचा आकडा वाढत असून गेल्या आठवडाभरात १८४ रुग्णांचा मृत्यू Dead झाले आहे. तर शनिवारी Saturdayमुंबईत ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षभरातील एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे.दरम्यान, मुंबईतील मृतांचा एकूण आकडा ११,९५९ वर पोहोचला आहे. मुंबईत आता रोज सरासरी १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णही मोठ्या संख्येने आढळत असून सध्या मुंबईत वेगवेगळ्या रुग्णालयात १,१९९ गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. 

अशात रुग्णांसाठी खाटाही उपलब्ध होत नसल्याने अडचणीत भर पडत आहे. पालिकेच्या डॅशबोर्डमध्ये Dashboard अनेक खाटा रिक्त दिसत असल्या, तरी रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड ICU Bed, ऑक्सिजन Oxygen तसेच व्हेंटिलेटर Ventilator उपलब्ध नसल्याचा अनुभव अनेक रुग्णांना येत आहे. खाटेसाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत असून त्यानंतरही अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत आहेत.

सध्याची स्थिती
पालिकेच्या वॉर रूम डॅशबोर्डमधील आजच्या माहितीनुसार मुंबईत एकूण २,४१० आयसीयू बेड आहेत. त्यातील २,३२३ बेड भरले असून केवळ ८७ बेड रिक्त आहेत; तर ९,७६२ ऑक्सिजन बेड असून ८,४८१ बेड भरले आहेत व १,२८१ बेड रिक्त आहेत. व्हेंटिलेटरवर बेडची क्षमता १,२७३ असून त्यापैकी १,२४३ बेड भरले असून ३० बेड रिक्त आहेत.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live