सोलापूर-बार्शीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः सरण रचत दिली कोरोना मृतदेहाला अग्नी

विश्वभूषण लिमये
रविवार, 2 मे 2021

कोरोनाच्या काळामध्ये अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी पळ काढल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले असेल. मात्र बार्शीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीचे सरण रचले. आणि स्वतः  मृतदेहाला अग्नी दिला आहे. 

सोलापूर: कोरोनाच्या Corona काळामध्ये अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी पळ काढल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले असेल. मात्र बार्शीच्या Barshi गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः कोरोनाने मृत Dead झालेल्या व्यक्तीचे सरण रचले आणि स्वतः मृतदेहाला अग्नी दिला आहे. Corona body cremated by Solapur Barshi group development officer

ही घटना सोलापूर जिल्ह्यातील  वैराग Vairag येथील  आहे. या चित्रात प्रशासकीय अधिकाऱ्याने शासकीय जबाबदारी बरोबर सामाजिक भान ही राखल्याचे दिसून येत आहे. रूपा इंद्रजीत राऊत (वय-६०) यांना त्यांच्या मुलाने दोन दिवसांपूर्वी वैराग येथील संतनाथ डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये Covid Center उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांना अधिक त्रास होत असल्याने काल त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यानंतर वैराग ग्रामपंचायतीच्या वतीने पंढरपुर रोडवरील स्मशानभूमीत सरण रचण्यात आले आणि त्यांचा अंत्यविधी Cremanation करण्यात आला. यावेळी स्वतः गटविकास अधिकारी शेखर सावंत आणि ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी मृत पावलेल्या व्यक्तीला कोवीड सेंटरमधून स्मशानभूमी पर्यंत आणले आणि स्वतःच्या हाताने सरण रचूत भडाग्नी दिला. Corona body cremated by Solapur Barshi group development officer

गट विकास अधिकारी शेखर सावंत आणि ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे या दोघांनी ग्रामपंचायत कर्मचारी अण्णासाहेब जगताप, स्वप्निल चौधरी, बाळासाहेब पांढरमिसे, पांडुरंग चव्हाण, प्रसाद भेंडे, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या सहकार्याने हा अंत्यविधी केला.  

काही दिवसापूर्वी एका रुग्णाच्या अंत्यविधीसाठी ग्रामसेवकाने Gramsevak पैसे मागितल्या बाबतची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र त्यानंतर स्वतः काही सेवेत असलेले शासकीय अधिकारी स्वतःच्या हाताने अंत्यविधी करत असल्याचे इथेच सर्वांना दिसून आले. यावरूनच प्रशासकीय यंत्रणा खंबीरपणे उभी असल्याचे समोर येते.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live