शाळांमध्ये घुसला कोरोना , कोरोनाच्या भीतीनं बहुतांश शाळांना टाळं

साम टीव्ही
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

राज्यातल्या शाळा शिक्षण विभागानं सुरु केल्या होत्या. पण शाळांमधील विद्यार्थ्यांनाही कोरोनाची बाधा होऊ लागलीय. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत कोरोनाची बाधा झालीय.

वाशिममध्ये २२९ विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आलीय. कोरोना झालेले विद्यार्थी आदिवासी निवासी शाळेतले आहेत. आतापर्यंत राज्यातल्या अनेक शाळांमध्ये कोरोना घुसलाय. कोरोनामुळं अनेक जिल्ह्यातील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्यात. 

राज्यातल्या शाळा शिक्षण विभागानं सुरु केल्या होत्या. पण शाळांमधील विद्यार्थ्यांनाही कोरोनाची बाधा होऊ लागलीय. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत कोरोनाची बाधा झालीय.

डिसेंबरनंतर जेव्हा कोरोनाचा प्रभाव ओसरला होता तेव्हा राज्यातल्या शाळा हळूहळू सुरु करण्यात आल्या. ग्रामीण भागातल्या शाळा सुरु करण्याचं सरकारचं धोरण होतं. पण हे धोरणं शिक्षण विभागाच्याच अंगावर उलटल्याचं दिसून आलंय. अनेक शाळा आणि विद्यार्थ्यांच्या होस्टेलमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले. नागपूरच्या पाटणसावंगीत 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. वर्ध्याच्या हिंगणघाटच्या होस्टेलमध्ये 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. लातूर एमआयडीसीतल्या एका होस्टेलमधील 40 विद्यार्थ्यांना कोरोना झाला. हे सगळं ताजं असताना साताऱ्यातल्या पुसेगावच्या सेवागिरी विद्यालयात 23  विद्यार्थ्यांना कोरोना झालाय. 

 शिक्षण विभाग शाळा सुरु करण्याबाबत सुरुवातीपासूनच साशंक होता. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोरोनाची बाधा झाल्याच्या घटना वाढल्यानं शिक्षण विभागाची कोरोनाबाबतची भीती खरी ठरलीय.
 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live