कोरोना आपोआप बरा होऊ शकतो...कसा? तुम्हीच वाचा...

साम टीव्ही
मंगळवार, 9 जून 2020
  • अनेक नागरिकांना कोरोना होऊन बरा झाल्याचं उघड
  • ना लक्षणं, ना तपासणी, तरी कोरोना झाला आपोआप बरा
  • ICMR च्या व्यापक सर्व्हेतून महत्त्वपूर्ण माहिती समोर

आता बातमी कोरोनाबाब समोर आलेल्या महत्त्वाच्या निष्कर्षाची... देशातील अनेक लोकांना कोरोना झाला, मात्र लक्षणं नाहीत आणि उपचारही नाहीत, तरीही कोरोना आपोआप बरा झाल्याचं समोर आलंय. ICMR ने देशभरात केलेल्या व्यापक तपासणीतून ही बाब समोर आलीय... पाहूयात..

कोरोनाचं संकट आल्यापासून रोजच्या रोज कोरोनाग्रस्तांचे आकडे आपल्यासमोर येतायत. देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतानाच दिसतोय, मात्र या सगळ्यात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलीय. कोरोनाची लागण झालेले देशातील एक तृतीअंश नागरिक आपोआप बरे झाल्याचं उघड झालंय. खुद्द ICMR नेच हा दावा केलाय. म्हणजेच कोरोनाची लागण झालीय पण लक्षणं नसल्याने तपासणीही केली नाही, त्यामुळे उपचारही केले नाहीत, तरी अशा लोकांचा कोरोना आपोआप बरा झाल्याचा निष्कर्ष समोर आलाय. ICMR ने महाराष्ट्रासह देशातील तब्बल 70 जिल्ह्यांत सखोल पाहणी करून हा निष्कर्ष काढलाय. लोकांच्या रक्तातील अण्टिबॉडीजची पाहणी हा या निष्कर्षाचा मूलभूत आधार आहे.

ICMR ने कोणत्या जिल्ह्यात केली पाहणी?
महाराष्ट्रातील बीड, नांदेड, परभणी, जळगाव, अहमदनगर, सांगली येथील लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. महाराष्ट्रासह देशभरातील 70 जिल्ह्यांतील लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर रक्तातील अॅण्टिबॉडीजची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेकांना कोरोना होऊन तो आपोआप बरा झाल्याचा निष्कर्ष समोर आलाय.

याचाच अर्थ असा की, आपल्याला कोरोना झाल्याचं अनेकांना समजलंच नाही, मात्र नंतर तो आपोआप बरा झालाय. याच सूत्रानुसार देशातील अनेक कन्टेन्मेंट झोनमधूनही कोरोना आपोआप गायब झालाय. कोरोनाच्या या संकटात ICMR ने काढलेला निष्कर्ष महत्त्वाचा आहे. रोगप्रतिकार शक्तीमुळे हे शक्य झाल्याचं तज्ज्ञ सांगतायत. कोरोना होऊन तो आपोआप बरा होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, अशा लोकांकडून रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना कोरोनाची लागण होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी. त्याचसोबत आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हा धडा आपण सगळ्यांनी ICMR च्या या निष्कर्षातून घ्यायला हवा.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live