कोरोनामुळे ढोल-ताशा पथकांवर आर्थिक संकट...(पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

पण कोरोनामुळे ना शोभायात्रा होत आहेत, ना ढोल ताश्यांचा गजर घुमतोय. या सर्वामुळे ढोल- ताश्यावादन करणाऱ्यांची मात्र मोठी निराशा झाली आहे. निर्बंधामुळे ढोल-ताशांचा गजर थांबला आहे

मुंबई : गुढीपाडवा म्हटले की ढोल-ताशांचा आवाज आलाच, पण कोरोनामुळे Corona ना शोभायात्रा होत आहेत, ना ढोल ताश्यांचा गजर घुमतोय. या सर्वामुळे ढोल- ताशावादन करणाऱ्यांची मात्र मोठी निराशा झाली आहे. Corona causes financial crisis to the youth of Dhol Tashe group

निर्बंधामुळे Restrictions ढोल-ताशांचा गजर विरळला आहे. ना शोभायात्रा, ना मिरवणूक... फक्त पोटाची पिळवणूक. यामुळे ढोल-ताशे पथकातील तरुणांचं मोठे नुकसान झाले आहे. ढोल- ताशा पथकांसह राज्यातल्या कानाकोपऱ्यांत हजारो लेझीम, पारंपरिक वाद्यांची पथके कार्यरत आहेत. परंतु, कोरोनामुळे या सर्व घटकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

आसमंन्त निनादून टाकणारा, अंगाला नाचवणारा हा आवाज तसेच मराठी संस्कृतीच, शौर्याच आणि कलेचंही नयनरम्य दर्शन देणारा हा सोहळा हा गुढीपाडव्याचा आणि त्याच्या मांगल्याचा असतो. पण आता हा आवाज मागच्या वर्षांपासून विरला आहे. ज्या रस्त्यांवर आधी शोभायात्रा निघायच्या, आता ते रस्ते सामसूम दिसत आहेत. लॉकडाउन व निर्बंधाचा फेरा पडल्याने शोभायात्रा रद्द झाल्या आहेत. 

Edited By- Digambar Jadhav               
 


संबंधित बातम्या

Saam TV Live