सावधान! कोरोना आणि डेंग्युची युती...कोरोनामुळे अचानक प्लेटलेट्सची संख्या घटतेय

साम टीव्ही
सोमवार, 14 सप्टेंबर 2020
  • सावधान..कोरोना आणि डेंग्युची युती..
  • कोरोनानं धारण केलंय नवं रुप
  • कोरोनामुळे अचानक प्लेटलेट्सची संख्या घटतेय

अनेक महिन्यांपासून कोरोना आपलं रुप बदलतोय. आता त्यात आणखी एका नव्या लक्षणाची भर पडलीय. कोणतं आहे हे लक्षण. पाहुयात एक रिपोर्ट

अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या लक्षणांमध्ये भर पडतीय. त्यात आता चिंता वाढवणारं एक लक्षण दिसून आलंय. कोरोना व्हायरसमुळे प्लेटलेट्सची संख्या अचानक घटताना दिसून आलीय. डेंग्युच्या रुग्णांमध्ये अशा पद्धतीची लक्षणं दिसतात. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे व्यक्तीच्या प्लेटलेट्स अचानक 20 हजारांपेक्षा कमी होतात. 

  • कोरोनामुळे व्यक्तीच्या शरिरातील प्लेटलेट्सची संख्या 20 हजारांहून खाली जाते. 
  • डेंग्यु आजारात अशा पद्धतीनं प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होते.
  • कोरोना व्हायरस व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो.
  • प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे मोनोसाईड आणि मायकरोफेज पेशींवर परिणाम होतो. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या लक्षणीय पद्धतीनं घटते.
  • दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असतानाच मुंबईसह महाराष्ट्रात मलेरियानंही डोके वर काढलंय. कोरोनाची लक्षणे मलेरियासारखीच आहेत, आता त्यात डेंग्युप्रमाणे प्लेटलेट्सची संख्या घटणं या लक्षणाचीही भर पडलीय. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरची आव्हानं वाढलीयेत.
     


संबंधित बातम्या

Saam TV Live