सावधान! कोरोना रुप बदलतोय, आणि हे बदलेलं रुप आणखी भयानक...

साम टीव्ही
गुरुवार, 7 मे 2020

 

  • कोरोना रुप बदलतोय, बदलेलं रुप आणखी भयानक
  • अमेरिकन शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून धक्कादायक बाब उघड
  • यापुढे स्थानिक रोगांनाही सोबत घेऊन कोरोनाचा हल्ला ?

 

कोरोनावर लस शोधण्यासाठी शर्थाचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यापूर्वीच शास्त्रज्ञांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय.

कोरोनावर लस शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत पण त्यापूर्वीच शास्त्रज्ञांपुढे एक गंभीर आव्हान उभं ठाकलंय. जगभर पसरलेला कोरोना उत्क्रांत होतोय, म्हणजेच जगभर पसरलेल्या कोरोनानं आपलं रुप बदलायला सुरुवात केलीय. धक्कादायक म्हणजे हे बदलेलं रुप सुरुवातीच्या कोरोनापेक्षा अधिक भयानक आहे, असा अहवाल अमेरिकन शास्त्रज्ञांनी दिलाय. 

 

रुप बदलेल्या कोरोनाची भीती आहे, कारण...  

  • कोरोनाबाधितांना प्रचंड अशक्त बनवणार
  • कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनाही पुन्हा कोरोना होण्याचा धोका
  • दरवर्षी कोरोनासाठी नवीन लस बनवावी लागणार
  • स्थानिक साथीच्या रोगांना घेऊन नागरिकांवर कोरोनाचा हल्ला
  • कोरोना व्हायरस आपल्या रचनेत सातत्यानं बदल करतोय. अनेक देशांमधील आधीच अस्तित्वात असणाऱ्या साथीच्या आजारांना सोबत घेऊन कोरोना त्या त्या देशातील नागरिकांवर हल्ला करतोय. त्यामुळे कोरोनाप्रतिंबधक लस शोधताना या बदलणाऱ्या कंगोऱ्यांचा शास्त्रज्ञांना नक्कीच विचार करावा लागेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live