राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 52वर, तर 5 जणांना बरं करण्यात यश
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 52वर, तर 5 जणांना बरं करण्यात यश
रामनाथ दवणे
शुक्रवार, 20 मार्च 2020
चुकूनही कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सगळ्यात आधी पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चाललाय.
मुंबई - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 52वर गेल्याचं सांगितलं. मात्र महत्त्वाचं म्हणजे 5 रुग्णांना बरं करण्यात यश आल्याचं दिलासादायक वृत्तदेखील राजेश टोपे यांनी यावेळी दिलं. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी कोरोना बरा करण्यात राज्यातील डॉक्टरांना यश येत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच ज्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे, त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.
चुकूनही कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सगळ्यात आधी पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चाललाय. मात्र प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपती प्रयत्न केले जात आहेत.
राज्यात 10 मार्चपासून कशा पद्धतीनंन रुग्ण वाढत गेले?
10 मार्च - 2
13 मार्च - 11
14 मार्च - 19
15 मार्च - 31
16 मार्च - 33
17 मार्च - 39
18 मार्च - 42
19 मार्च - 49
आज 20 मार्च - 52 (सकाळी 11 वाजेपर्यंत)
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12.30 वाजता फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. कालही उद्धव ठाकरे यांनी लोकांशी संवाद साधत गर्दी टाळण्याचं आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत तस आरोग्यमंत्र्यासोबतही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधरणा आहेत. यामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यताय.
सर्वच सरकारी यंत्रणा करोनाला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. आता राज्यातील जनतेनं सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं. प्रसंगी सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. ती वेळ आणू नका, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
आरोग्यमंत्र्यांनी केलेली महत्त्वाची विधानं -
- ज्या टेस्ट घेतल्या आहेत त्यातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ..
- महाराष्ट्रात 52 पॉइझिटिव्ह रुग्ण
- 22 तारखेला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत कर्फ्युबाबत घोषणा.
- पंतप्रधान यांनी योग्य निर्णय घेतला आहे जनतेने तंतोतंत बंद पाडावा
- संसर्गजन्य हा आजार आहे हे स्पष्ट झाल्याने गर्दी टाळा
- दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स होणार
- ज्या राज्यात कोरोना याचा प्रादुर्भाव आहे त्यांच्याशी पंतप्रधान 4 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधणार
- जे रुग्ण दाखल झाले होते त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, 5 रुग्णांना आज डिस्चार्ज दिला जाईल. याचा अर्थ रुग्ण बरा होतो
- आज कोरोना रुग्ण वाढलेले आहेत, मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड येथील रुग्णात वाढ
- महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत अतिदक्षतेचा रुग्ण असेल त्याचा संपूर्ण खर्च सरकारकडून
- आतापर्यंत जी लक्षण आढळलेली आहेत ते प्रवासी 971होते व एकूण 1 हजार 036 प्रवाशांची तपासणी केली
- कलोरोकिन हा उपचार असू शकतो हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे पण त्या बाबतींत अजून तपास चालू आहे.
- पंतप्रधान यांनी जे काल आव्हान केले आहे, रविवारी सेल्फ कर्फ्यु ची घोषणा करण्यात आली आहे त्याला जनतेने 100% प्रतिसाद दिला पाहिजे, या आजारातून मुक्त होण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
- आता आपण 6 लॅब मध्ये टेस्ट करत आहोत येणाऱ्या दिवसात ही संख्या 12 होईल.
पाहा व्हिडीओ -
corona covid 19 virus increase in maharashtra patient rajesh tope marathi modi shivsena uddhav thackerey mumbai