ही बातमी तुम्हाला स्तब्ध करेल! पाहा, कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर काय होतं?

साम टीव्ही
शनिवार, 9 मे 2020

आपला अखेरचा प्रवास हा असा होऊ नये, असं वाटत असेल, तर घरीच थांबा. माणूस म्हणून जन्म घेतलाय.. तेव्हा कधीतरी मरण येणार हे निश्चित आहे. मृत्यू...

कोरोनाने केवळ माणसालाच घरात बसवलं नाही. तर माणुसकीलाही घरी बसवलंय. मृत्यूची भीती सगळ्या नात्यांवर भारी पडलीय. आणि आपल्या माणसाच्या अंत्यसंस्कारासाठीही मन धजावत नाहीये. ही बातमी तुम्हाला स्तब्ध करेल.

किती दिवस असं घरी बसायचं?.  कंटाळलो आता! आणि मेलो म्हणून झालं काय? इतके दिवस घरी बसल्यानंतर असे विचार जर तुमच्या मनात येऊन गेले असतील. तर ही दृश्य बघा. कोरोना होतो.. तुम्ही मरण पावता. म्हणजे नेमकं काय होतं. याचा अंदाज येईल.

आपल्या नात्या गोत्यात नसलेली माणसं, आपला मृतदेह भीतीच्या छायेत हाती घेतात. कुणाच्या रडण्याचा आवाज नसतो. की कुणी आपलं माणसू गेल्याच्या भावनेने फोडलेला हंबरडा नसतो. असते ती एक भयाण शांतता.

जीवाभावाची माणसं अंत्यसंस्कारासाठी धजावत नसताना, हे योद्धे...जात, धर्म, वगैरे सगळं सगळं विसरुन शेवटच्या प्रवासात सोबती होतायत... पण आपलं माणूस या अखेरच्या प्रवासात सोबत नाहीये... याची खंत भरुन निघेल..? आपण आपल्या माणसाला खांदा देऊ शकलो नाही... याची सल खरंच संपेल..? 

आपला अखेरचा प्रवास हा असा होऊ नये, असं वाटत असेल, तर घरीच थांबा. माणूस म्हणून जन्म घेतलाय.. तेव्हा कधीतरी मरण येणार हे निश्चित आहे. मृत्यू... मग तो कुणाचाही असो... वाईटच... पण शेवटचा प्रवास सुरू असताना आपल्या जवळच्या माणसांच्या डोळ्यात दु:खाऐवजी भीती असणं केवळं दुर्दैव.  म्हणून संयम राखायला हवाय. घरात बसायला हवंय. आपल्यासाठीही आणि आपल्या जवळच्या माणसांसाठीही...


संबंधित बातम्या

Saam TV Live