इथं ओशाळला मृत्यू.....

Corona Death Rising in Aurangabad
Corona Death Rising in Aurangabad

औरंगाबाद : कोरोनाच्या Corona मृत्यूने अक्षरशः तांडव माजवले आहे. एरवी सुन्या-सुन्या राहणाऱ्या शहरातील स्मशानभूमींमध्ये माणसाची वर्दळ थांबण्याचे सध्या नावच घेत नाही. एकापाठोपाठ एक मृतदेह Dead Bodies आणले जात आहेत. एकावेळी चार-पाच चिता जळतानाचे चित्र मन विषन्न करणारे आहे. पीपीई किट PPE Kit परिधान करून जिवाची पर्वा न करता मृतदेह घेऊन येणारे कर्मचारी आणि ॲम्ब्युलन्सचा स्मशानभूमीतील राबता महामारीचा प्रत्यय आणून देणारा आहे. Corona Death Rising in Aurangabad

येथे ओशाळला मृत्यू.... म्हणजेच मृत्यूलाही Deaths भय वाटावे अशी काहीशी परिस्थिती सध्या शहरातील वेगवेगळ्या स्मशानभूमीत आहे. प्रतापनगर, एन-११, मुकुंदवाडी, एन-सहा आणि कमी-अधिक प्रमाणात सर्वच स्मशानभूमीत विदारक चित्र आहे.

कोरोनाच्या मृत्यूचे शहरात तांडव सुरू झालेले आहे. स्मशानभूमीत एका-पाठोपाठ मृतदेह घेऊन येणाऱ्या ॲम्ब्युलन्स Ambulance धडकत आहेत. एका वेळी चार-पाच किंवा सहा आणि चिता पेटवण्याचा खंड पडत नाही. विशेषता सकाळच्या वेळी येणाऱ्या मृतदेहांची संख्या प्रचंड आहे. Corona Death Rising in Aurangabad

घाटी रुग्णालयातून Aurangabad एका ॲम्‍ब्युलन्समधून दोन मृतदेह आणावे लागत आहेत. दोन चिता पेटवल्यानंतर या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा घाटी रुग्णालयात दुसरे मृतदेह तयार असतात अशीच काहीशी परिस्थिती आहे. स्मशानभूमीत Crematorium मृतदेहाचा चेहरा उघडून पाहण्याची सोय नसली तरीही पारदर्शक प्लॅस्टिकमुळे चेहरा जसा दिसेल तसा पाहावा, एवढेच नातेवाइकांच्या हातात शिल्लक आहे. Corona Death Rising in Aurangabad

दूरवर उभे राहून आपली आई, बाबा, आजी-आजोबा, ताई-भावजी किंवा आप्तेष्टांना निरोप देताना त्यांना फोडलेला हंबरडा पाहून कुणाच्याही डोळ्यांत अश्रू यावेत, अशी स्थिती आहे. आपल्यासमोर जवळचे नाते संपताना होणारी घालमेल सुन्न करणारी आहे. कुणी आई-वडील गामावले, तर कुणी आजी किंवा आजोबा तर कुणी पती गमावला तर कुणी पत्नीला गमावले आहे. एकूणच परिस्थिती मात्र विदारक आहे. Corona Death Rising in Aurangabad

पीपीई किटमध्येच होतेय अंघोळ
पीपीई किटमध्येच अंघोळ होत असल्याचा प्रकार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे. घाटी रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पीपीई किट घातलेल्या या कर्मचाऱ्यांना स्मशानभूमीत मृतदेह आणणे, स्मशानभूमीत सरण रचणे, त्यावर मृतदेह ठेवणे, त्यानंतर चितेला अग्नी लावणे ही कामे करावे लागतात. चिता पेटल्यानंतर काही वेळ त्याच्या भोवतीच राहून डिझेलचा मारा करावा लागतो. या संपूर्ण प्रक्रियेला किमान दोन तासांचा वेळ जातो. 

चिता पेटल्यानंतर हे कर्मचारी स्मशानभूमीतच पीपीई कीट काढतात. पीपीई किट काढल्यानंतर हे कर्मचारी पाण्यात उडी घेतल्याप्रमाणे नखशिखांत ओलेचिंब झालेले असतात. हाताची आणि पायाची त्वचा ओलाव्याने सुरकुतल्यासारखी होते. हा प्रसंग पाहिल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या कामाची किंमत कळाल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे, एक मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर दुसऱ्याच्या तयारीला पुन्हा जावे लागते. हाच दिनक्रम सुरू असतो...! Corona Death Rising in Aurangabad

असे आहे चित्र

- स्मशानभूमीत एकापाठोपाठ येताहेत मृतदेह
- एका वेळी चार-पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार
- एका ॲम्ब्युलन्समध्ये आणावे लागतात दोन मृतदेह
- पहिला जळाला की दुसऱ्याला करावी लागते जागा
Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com