भयानक! आतापर्यंत 7 हजार जणांना कोरोनानं गिळलं, त्यात भारतातले 3 जण

WORLD_CORONA_01 960
WORLD_CORONA_01 960

मुंबई - कोरोनाचा उगम झाला तो चीनमध्ये. चीनच्या बीजिंमधील हुबेईमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण आढळला खरंतर गेल्या वर्षी. नोव्हेंबरमध्ये पहिला रुग्ण चीनमध्ये सापडला होता. त्यानंतर पटापट कोरोनाचे रुग्ण वाढले. खळबळ उडाली. आणि चीनमधी कोरोना झालेल्या रुग्णांच्या वृत्तानं सगळ्यांचीच झोप उडवली. 

कोरोनामुळे आतापर्यंत चीनमध्ये 3 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 80 हजार 860 रुग्णांची संख्या चीनमध्ये कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

अमेरिकेलाही लागण

चीननंतर लगेचच अमेरिकेतही कोरोनाचा संसर्ग वाढला. अमेरिकेत आतापर्यंत ३,७७७ जणांना बाधा झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शाळा, रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. सोबतच  मनोरंजनाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आलेले आहेत. 

भारतालाही कोरोनाची बाधा


कोरोनाचा भारतात सगळ्यात आधी रुग्ण आढळला तो केरळात. केरळनंतर दिल्ली, कर्नाटक आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. वायूवेगाने सध्या भारतात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. कोरोनाला रोखण्याचं आव्हान सध्या भारत सरकारपुढे आहे.

कॅनडामध्येही कोरोना, अनेक भारतीय अडकले

कॅनडामध्ये अनेक भारतीय आहे. तिथेही कोरोनाचा प्रसार वाढतोय. कॅनडामध्ये दहा प्रांतांत कोरोनाबाधितांची संख्या ३१३ वर गेली आहे. टोरँटो, माँट्रियल आणि व्हॅन्कूअर येथे कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला असून आतापर्यंत सुमारे २५ हजार नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे.

कोरोनाचा क्रिकेटवर परिणाम 

कोरोना वायरसमुळे क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर परिणाम झालाय. बांगलादेशचा संघ येत्या २९ मार्चला कराचीला येणार होता. या सामन्यासह मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. तर दुसरीकडे भारत द. अफ्रिका मालिकाही रद्द करण्यात आली आहे. 

फ्रान्समध्ये २९ जणांचा मृत्यू

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये कोरोनाचा प्रसार वाढतोय. फ्रान्समध्ये चोवीस तासांत 29 जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत फ्रान्समध्ये 120 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता ही गंभीर परिस्थिती पाहता, फ्रान्समधील नागरिकांना घरातच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियात 350 जणांना कोरोनाची लागण

ऑस्ट्रेलियातही कोरोना पसरलाय. तिथे तब्बल 350 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने सगळ्यात महत्त्वाचे आणि कडक निर्णय घेतले आहेत. परदेशातील क्रूझ येण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. परदेशी क्रूझला  ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर थांबता येणार नाही आहे. 

जगभरात एकूण 1 लाख 98 हजार 312 जणांना कोरोनाची लागण

एकूण मृत्यू - 7 हजार 979

कोणत्या देशात किती मृत्यू?

  • चीन - 3 हजार 237
  • इटली - 2 हजार 503
  • इराण - 2 हजार 988
  • फ्रान्स - 175
  • अमेरिका - 102

MUMBAI CORONA VIRUS COVID 19 MAHARASHTRA WORLD INTERNATIONAL GLOBAL HEALTH DEATH TOLL IN INDIA MAHARASHTRA MARATHI

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com