अबब! भंडाऱ्यात सहा दिवसांत कोरोनाचे 26 मृत्यू

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

आत्ता पर्यंत जिल्ह्यात  22 हजार 385 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 16 हजार 12 रुग्ण कोरोना मुक्त होत घरी परतले आहे. तर 369 लोकांचा झाला कोरोना मुळे मृत्यु झाला आहे.

भंडारा : अबब ! भंडारा (Bhandara) जिल्ह्यावासियांनो नियम पाळा. भंडारा जिल्ह्यात सहा दिवसात तब्बल 26 कोरोना (Corona)  रुग्णाचा मृत्यु झाला असून भंडारा जिल्हावर यमराजाची नजर असल्याचे बोलले जात आहे. Corona Deaths increasing in Bhandara District

भंडारा जिल्ह्यात दररोज 800 च्या वर कोरोना रुग्ण आढळत आहे. भंडारा शहरा सोबत आता ग्रामीण भागात ही कोरोना ने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 868 कोरोना रुग्ण आढळले असून 8 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर सध्या भंडारा जिल्ह्यात 6004 कोरोना एक्टीव्ह (Active) रुग्ण उपचार घेत असून सर्वात जास्त रुग्ण  भंडारा तालुक्यातील आहेत.

आत्ता पर्यंत जिल्ह्यात  22 हजार 385 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 16 हजार 12 रुग्ण कोरोना मुक्त होत घरी परतले आहे. तर 369 लोकांचा झाला कोरोना मुळे मृत्यु झाला आहे. यामुळे भंडारा जिल्हा प्रशासनाच्या (District Administration) चिंतेत वाढ झाली आहे. Corona Deaths increasing in Bhandara District

त्यामुळे नियम पाळण्याची सक्ती करण्यात आली असून रात्रीची संचार बंदी जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. आता जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचार बंदी असणार असून दिवसा 7 ते रात्री 8 पर्यंत जमाव बंदी असणार आहे. रोज भंडारा जिल्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण  800 च्या वर आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live