#corona इफेक्ट | अवघ्या 10 रुपयांत मिळतेय जिवंत कोंबडी

#corona इफेक्ट | अवघ्या 10 रुपयांत मिळतेय जिवंत कोंबडी

अमरावती- चिकन खाल्ल्यानं कोरोना पसरतो, या एका अफवेमुळे पोल्ट्री फार्मधारकांचे चांगलंच दिवाळं निघालंय. ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवल्यानं या व्यापाऱ्यांचं तब्बल 400 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.


कोरोना व्हायरसमुळे चिकन विक्रेत्यांवर दर कपातीची मोठी कुऱ्हाड कोसळली आहे. राज्यातील बहुतांश चिकन मार्केटमध्ये जिवंत कोंबडी अवघ्या 10 ते 15 रुपयांत उपलब्ध झाली आहे. चीनमधील कोरोना व्हायरस संसर्ग आणि चिकनचा संदर्भ जोडला गेल्यानं चिकन विक्रीवर याचा मोठा परिणाम झालाय. कोरोना आणि चिकन दूर दूर पर्यंत काहीही संबंध नसल्याचं चिकन विक्रेते सांगून सांगून थकले आहे. मात्र, तरी देखील चिकन पेक्षा कोरोनाचाच प्रभाव लोकांच्या मनात अधिक झाला आहे. त्यामुळे चिकन विक्रेत्यावर हतबल होऊन अक्षरशः ऑफर देण्याची नामुष्की ओढवली आहे. या उत्पादकांना मातीमोल भावानं होलसेलर्सना कोंबड्या विकाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी तर 100 रुपयांत 2 किंवा 3 कोंबड्या विकण्याची वेळ पोल्ट्री धारकांवर आली आहे. 


अनेक होलसेलर कोंबड्या स्वस्तात खरेदी करून ग्राहकांना मात्र भरमसाठ दरानं विकत आहेत. 60 रुपयांची कोंबडी अनेक होलसेलर तब्बल 150 ते 180 रुपयांना विकत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता चिकन उत्पादकांनी स्वतः थेट ग्राहकांना चिकन विकण्याचा निर्णय घेतलाय. नुकतीच पोल्ट्रीधारक आणि होलसेलर्स यांची बैठक झाली..या बैठकीत किरकोळ विक्रेत्यांनी चिकन 60 रु.किलोनं विकण्याचा निर्णय घेतला आहे.


अफवेमुळे खवय्यांना त्यांच्या आवडत्या चिकनचा आस्वाद घेता येत नाहीए..तर दुसरीकडे उत्पादकही मेटाकुटीला आलेत..चिकनचा आणि कोरोनाचा संबंध नाही, असं वारंवार सांगूनही लोकांच्या गळी ते उतरत नाही...त्यामुळे खवय्यांनीच आता  पुढाकार घेऊन चिकन विक्रीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे..

पाहा व्हिडीओ - 

WEB TITLE- Cock get only Rs 10! corona effect on chicken rates in india china 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com