कोरोना इफेक्ट : शरद पवारांचा जळगाव दौरा स्थगित

सरकारनामा
शुक्रवार, 6 मार्च 2020

जळगाव : "कोरोना'व्हायरस अधिक पसरू नये यासाठी शासनातर्फे दखल घेण्यात येत आहे. 50 किंवा त्या पेक्षा अधिक लोकांनी जमू नये,लोकांनीच सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवार (ता.9) चा जळगाव दौरा स्थगित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवार (ता.9) जळगाव दौरा आयोजित करण्यात आला होता. चांदसर (ता.धरणगाव)येथे शेतकरी मेळावा व माजी आमदार (कै.)मु.ग.पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते. तर शेदुर्णी (ता.जामनेर)येथेही जाहिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या दोन्ही कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.

हेही पाहा:: धक्कादायक! कर्ज थकल्यानं शेतकरी महिलेकडे शरिरसुखाची मागणी

देशात "कोरोना'व्हायरसचा धोका निर्माण झाल्याने ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनीही दौरा स्थगितीला दुजोरा दिला आहे. शेंदुर्णी येथील कार्यक्रमाचे आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरूड यांनी सांगितले, "कोरोना'व्हायरसचा धोका लक्षात घेवून दौरा स्थगित करण्यात आला आहे. दिल्ली येथून शरद पवार यांचे स्वीय सहाय्यकांनी दुपारी दोन वाजता फोन करून दौरा स्थगित झाल्याचे आपणास सांगितले.

याबाबत जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, कार्यक्रम रद्द करण्याचे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत. परंतु "कोरोना'व्हायरस लागण पसरण्याचा धोका लक्षात लोकांनीच सार्वजनिक कार्यक्रम टाळायला हवेत. असे अवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयोजक निर्णय घेत आहेत. 
 
WebTittle :: Corona Effect: Sharad Pawar's Jalgaon tour postponed 

संबंधित बातम्या

Saam TV Live