BIG BREAKING | कोरोनावर अखेर लस मिळाली! इंग्लंड हा लस शोधणारा पहिला देश

साम टीव्ही
बुधवार, 2 डिसेंबर 2020

अखेर कोरोनावर लस मिळाली आहे. आणि इंगलंड हा लस शोधणारा पहिला देश ठरलाय. तर इंग्लंडमध्ये फायजर बायोएनटेक कोव्हिड 19 लसीला मंजुरी देण्यात आलीय.

सर्वात मोठी बातमी बातमी समोर येतेय. अखेर कोरोनावर लस मिळाली आहे. आणि इंगलंड हा लस शोधणारा पहिला देश ठरलाय. तर इंग्लंडमध्ये फायजर बायोएनटेक कोव्हिड 19 लसीला मंजुरी देण्यात आलीय. याचाच अर्थ कोरोनावर आता अखेर लस सापडली असून इंग्लंडमध्ये पुढील आठवड्यापासून संपूर्ण देशात लसीकरणाला सुरूवात होणार आहे.

गेल्या वर्षभरापासून जे संकट संपूर्ण जगावर ओढावलं होतं त्यातून आता अखेर सर्वांची सुटका होणार आहे. अनेक देशांमध्ये कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. काही ठिकाणी ही चाचणी अंतिम टप्प्यातही पोहोचलीय. मात्र इंग्लंडनं सर्वात आधी बाजी मारली असून कोरोना लसीला अधिकृत मंजुरी देणारा इंग्लंड हा पहिला देश ठरलाय.

पाहा यासंदर्भातील महत्वाची माहिती -

 

तर भारतातही कोरोना लस बनवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुय, त्यासाठी 2 चाचण्याही पूर्ण झाल्या असून आता तिसरी चाचणी फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार असल्याचं कळतंय. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी सीरम इन्स्टीट्यूटला भेटही दिली होती. त्यानंतर ही लस संपूर्ण देशात मोफत देण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं कळतंय. त्यामध्ये सर्वप्रथम पोलिस, सुरक्षा रक्षक आणि जेष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येईल असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय. 

दरम्यान सध्या तरी इंग्लंडनं यात बाजी मारली असून संपूर्ण जगाला प्रतिक्षा असलेली ही लस शोधून काढली आहेे.  त्यानंतर आता पुढील आठवड्यात त्या लसीचं वितरण होणार असून आपल्यापर्यंत ती लस कधी पोहोचते, ते पाहणं महत्वाचं असेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live