सावधान... सणासुदीत वाढू शकतात कोरोनाचे रुग्ण, वाचा केंद्रीय समितीचा हा चिंताजनक इशारा

साम टीव्ही
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020
  • सावधान... सणासुदीत वाढू शकतात कोरोनाचे रुग्ण
  • गणेशोत्सवानंतरही वाढले होते कोरोनाचे रुग्ण
  • केंद्रीय समितीकडून चिंताजनक इशारा

भारतासह जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच, अर्थचक्र सुरू होण्यासाठी अनलॉकही जाहीर करण्यात आलाय. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा नियंत्रणात येत असतानाच केंद्राच्या समितीने चिंता वाढवणारा इशारा दिलाय. अर्थात, गणेशोत्सव आणि ओणमच्या सणानंतर कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढल्याAचं उदाहरण समोर असल्याने केंद्रीय समितीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

सणासुदीत वाढणार कोरोनाचा संसर्ग
सणासुदीच्या काळात सूट दिल्यास महिन्याला कोरोनाचे 26 लाख नवे रुग्ण सापडण्याचा इशारा केंद्रीय समितीने दिलाय. त्याचसोबत भारतातील फक्त 30 टक्के नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत येणारा हिवाळा आणि उत्सवांमध्ये निष्काळजी केल्यास कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात असा इशारा समितीने दिलाय. त्यामुळे दसरा, दिवाळीच्या सणांमध्ये कोरोनाबाबत अधिकची काळजी घेण्याची गरज असल्याचंही समितीने म्हटलंय. असं असलं तरी, संपूर्ण काळजी घेतल्यास फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतात कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल असं समितीने म्हटलं आहे.

ही सगळी परिस्थिती पाहता आणि गणेशोत्सवात वाढलेले कोरोनाचे रुग्ण पाहता, येणाऱ्या दसरा, दिवाळीच्या सणांमध्ये सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. डिसेंबर, जानेवारीत कोरोनावर लस येण्याची आशा सर्वांनाच आहे, मात्र तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायलाच हवा. तरच माझं कुटुंब माझी जबाबदारी या घोषणेचा खऱ्या अर्थाने फायदा होऊ शकेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live