गोव्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याची निव्वळ अफवा

सिद्धेश सावंत
बुधवार, 18 मार्च 2020

कोरोनाचा गोव्यातील हा  पहिला रुग्ण असल्याचा अंदाज बांधला जात होता. नॉर्वेमधील एका तरुणाला कोरोना झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

पणजी - गोवा हे पर्यटकांनी नेहमी गजबजलेलं असतं. याच गोव्यात कोरोनाचा रुग्ण असल्याचा संशय एकावर घेण्यात आला होता. कोरोनाचा गोव्यातील हा  पहिला रुग्ण असल्याचा अंदाज बांधला जात होता. नॉर्वेमधील एका तरुणाला कोरोना झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या तरुणाची तातडीनं चाचणी कऱण्यात आली. या संशयीत 24 वर्षीय तरुणानं दिल्ली, आग्रा, आसाम, मेघालय आणि गोवा असा प्रवासही केला होता. मात्र या तरुणाला कोरोनाची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.. या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी तसं जाहीर केलं आहे. 

 

 

गोव्यामध्ये मोठ्या संख्येनं परदेशी पर्यटक येत असतात. या पर्यटकांचीही सध्या विमानतळावर कसून तपासणी करण्यात येते आहे. संशयास्पद पर्यटकांची चाचणी केल्यानंतरच त्यांना पुढे पाठवण्यात येत आहे. गोव्यात परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येते आहे. कोरोनातील पर्यटकांमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची सगळ्यात जास्त भीती आहे. त्यासाठी विशेष खबरदारी घेणं सध्या गरजेचं  मानलं जात आहे.

 

सध्या ताब्यात घेतल्लाय संशयित रुग्णाला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नेण्यात आलं होतं. दरम्यान, या तरुणाला  विशेष कक्षात त्‍याला ठेवण्‍यात आलं होतं. मात्र या तरुणाला कोरोना झालेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे.  

 

दरम्यान, गोवा राज्याच्या सीमा बंद कराव्यात अशी मागणीदेखील केली जात आहे. पर्यटकांवर एक ते दोन महिन्यांसाठी बंदी घालावी अशी मागणी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंक यांच्याकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्यात येते आहे. 

 

हेही वाचा - तब्बल 7 हजार जणांना कोरोनानं गिळलं

हेही वाचा - तुमच्या मास्कमुळेही तुम्हाला कोरोना होऊ शकतो

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

 

corona goa first patient positive come from norve marathi


संबंधित बातम्या

Saam TV Live