कोरोनामुळे लाल माती काळवंडली.. ( पहा व्हिडिओ )

साम टीव्ही ब्युरो
रविवार, 2 मे 2021

कोरोनाच्या महामारीचा फटका कुस्तीगारांना देखील बसलेला आहे. सलग दुसऱ्या वर्षी गावोगावी होणाऱ्या कुस्ती स्पर्धा रद्द झाले आहेत. त्यामुळे पैलवान अडचणीत सापडले आहेत. कोरोनामुळे लाल माती काळवंडली आहे

कोल्हापूर : कोरोनाच्या Corona महामारीचा फटका कुस्तीगारांना देखील बसलेला आहे. सलग दुसऱ्या वर्षी गावोगावी होणाऱ्या कुस्ती स्पर्धा Competition रद्द झाले आहेत. त्यामुळे पैलवान अडचणीत सापडले आहेत. कोरोनामुळे लाल माती काळवंडली आहे. सलग दुसऱ्या वर्षी कुस्ती आखाडा डावाविनाच होत आहे. त्यामुळे लाल मातीतील आखाडे सुनेसुने झाले आहे. The corona has dealt a major blow to the wrestling hail

नेहमी गजबजणारे आखाडे सध्या सुने पडले आहे. आखाड्यामध्ये दंड थोपटणारे पैलवान रोमहर्षक पकडी पाहायला मिळत नाही. आखाड्यातील लाल माती जणू काळवंडली आहे. कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी राज्यातील सर्वच यात्रा, जत्रा, उरूस कुस्ती स्पर्धा रद्द झाल्या आहेत. कुस्तीगिरांना त्याची मोठी झळ  बसली आहे. 

गावोगावी होणाऱ्या कुस्ती स्पर्धा त्यातून मिळणारी बक्षिस पैलवानासाठी खुराकाचा खर्च भागवण्याचा हाच तो मार्ग महत्वाचा होता. मात्र, सध्या स्पर्धा नाही, बक्षीस ही नाही, त्यामुळे खुराकाचा खर्च भागवायचा कसा ? असा प्रश्न त्यांना पडलं आहे. The corona has dealt a major blow to the wrestling hail

पैलवानाच्या आयुष्यातील वयाच्या ३५ वर्ष पर्यंतचा काळ खूप महत्वाचा असतो. या काळात जोरदार मेहनत करून, बक्षीस आणि स्पर्धा गाजवण्याचा काळ असतो. याच काळातील २ वर्ष कोरोनाने हिरावून घेतली आहेत. त्यामुळे प्रत्येक पैलवानाच्या आयुष्यातल कधीही न भरून येणार नुकसान झालं आहे. आता कोरोना महामारीचे संकट दूर होऊन पुन्हा एकदा शडू कधी ठोकता येईल, याचीच वाट पैलवान आणि त्यांचे वस्ताद पाहत आहेत.      

Edited By- digambar Jadhav  


संबंधित बातम्या

Saam TV Live