कोरोना बनवतोय तुमच्या फुफ्फुसांना दगड, वाचा नेमकं काय होतं?

साम टीव्ही
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020
  • सावधान...कोरोना बनवतोय तुमच्या फुफ्फुसांना दगड
  • अहमदाबादमधील डॉक्टरांचा धक्कादायक दावा 
  • कोरोनाचा फुफ्फुसांवर घातक परिणाम 

कोरोना आपली वेगवेगळी रूपं दाखवतोय. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणं दिसत होती. आता तर कोरोना आपल्या फुफ्फुसांना दगड बनवत असल्याचा दावा एका डॉक्टरनं केलाय.

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये लस तयार करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. अशातच अहमदाबादच्या सिम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कोरोना व्हायरस हा शरिरातील फुफ्फुसाला दगड बनवतो असा दावा केलाय. सिम्स हॉस्पिटलमधील डॉक्टर अमित पटेल यांनी कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम फुफ्फुसांवर होतो. ज्यावेळी संसर्ग वाढतो, त्यावेळी मऊ असणारं फुफ्फुस दगडांसारखं टणक होतं. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फायब्रोसिस हा क्षयरोग आणि न्यूमोनियामध्ये देखील होतो, मात्र तो केवळ फुफ्फुसांच्या वरच्या आणि खालच्या भागात होतो. कोरोनामध्ये त्याचा जास्त प्रभाव दिसतो. संपूर्ण फुफ्फुसात फायब्रोसिस झालं. तर त्यामुळे फुफ्फुसांचं नुकसान होतं. रोग प्रतिकारशक्ती सक्रिय झाल्यावर त्याचा पहिला परिणाम फुफ्फुसांवर होतो. व्हायरसच्या दुष्परिणामांमुळे आणि टिश्यू दुरुस्तीस मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे फुफ्फुसातील द्रव बारीक नसांमध्ये भरला जातो, जो नंतर गोठतो. यामुळे फुफ्फुस हळूहळू कठोर होऊ लागतं.
 

कोरोना थेट फुफुस्सांवर हल्ला  करत असल्यानं रूग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्वांनी आपणहूनच काळजी घेणं आवश्यक आहे. योगा, श्वसनाचे व्यायाम, पौष्टिक आहार या संकटातून तुम्हाला निश्चित दिलासा देऊ शकतात.


संबंधित बातम्या

Saam TV Live