COVID-19: मंगळवेढ्यात 41 मतीमंद मुलांना कोरोनाची बाधा

भारत नागणे
शुक्रवार, 28 मे 2021

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान  मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.

सोलापूर जिल्ह्यात कोरोनचा (Coronavirus) अजूनही प्रकोप सुरुच आहे. मंगळवेढा (Mangalvedha) तालुक्यातील एका मतीमंद शाळेतील 62 पैकी तब्बल 41 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. या घटनेने या गावात मोठी खळबळ उडाली आहे. सर्व बाधीत मुलांना सोलापूर (Solapur) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(Corona infection in mentally retarded school children in Solapur)

डीएनए आधारित लसीमुळे कोरोना लढ्याला नवी आशा

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान  मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. मागील आठवड्यात कोरोना  रुग्ण संख्या काही प्रमाणात कमी होत असतानाच, मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील मतीमंद मुलांच्या बालका श्रमातील 41 मतिमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

येथील काही मुलांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने एकूण 62 मुलांची कोरोना चाचणी केली. यामध्ये तब्बल 41 मंतीमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्व मुलांना तातडीने पुढील उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील बालकाश्रमात निराधार,मतीमंद,मुकबधीर अशा मुलांचे संगोपन केले जाते.सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे बालकाश्रम व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

Edited By : Pravin Dhamale 

हे देखील पाहा


संबंधित बातम्या

Saam TV Live