साहित्य संमेलनाच्या आयोजनाला बाधला कोरोना

साम टीव्ही
सोमवार, 8 मार्च 2021

नाशिकमध्ये होणारं साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलंय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं हा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनाची स्थिती पाहून संमेलनाची पुढची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये होणारं साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलंय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं हा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनाची स्थिती पाहून संमेलनाची पुढची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

येत्या 26 ते 28 मार्चला 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन देवभूमी नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. पण गेल्या काही दिवसांत नाशिकसह, मुंबई पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. रुग्ण हजारोंच्या संख्येनं वाढतायत. सण, समारंभांच्या आयोजनावर निर्बंध आहेत. अशा स्थितीत साहित्य महामंडळानंही साहित्य संमेलन स्थगितीची घोषणा केलीय.

 नाशिककरांनी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जोरदार तयारी केली होती. पण स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनाही कोरोना झाला होता. संमेलनाला येणाऱ्या ज्येष्ठांच्या प्रकृतीचा विचार करता हे संमेलन स्थगित करण्यात आलंय. जेव्हा कोरोनाचं उच्चाटन होईल तेव्हा त्याच उत्साहानं संमेलनाचं देवभूमीतच आयोजन करु असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय.
 
फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live