वैद्यकीय शिक्षण मंत्र्याच्या जिल्ह्यात कोरोनाचा विळखा

साम वृत्तसंथा
रविवार, 28 मार्च 2021

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या लातूर जिल्ह्याला कोरोनाचा विळखा पडला आहे. ही स्थिती अशीच राहिली तर येथे लाॅकडाऊन लावावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.​

लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या लातूर जिल्ह्याला कोरोनाचा विळखा पडला आहे. ही स्थिती अशीच राहिली तर येथे लाॅकडाऊन लावावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

कोरोनाचा(corona) होत असलेला उद्रेक पाहता प्रशासनाने जमावबंदी व आंदोलन करण्यात बंदी घातली असताना, नेत्यांना कोरोनापेक्षा आंदोलनाचे विषय महत्त्वाचे वाटत आहेत. तर मास्क व सोशल डिस्टन्स पाळण्याचे आदेश काढले असले तरी सुद्धा अनेक ठिकाणी नागरिक विनामास्क दिसत असून आंदोलने होत असल्याचे दिसून येत आहे. लातूरकर कोरोनाच्या बाबतीत गंभीर नसल्याने दिसून येत आहेत.

सध्याला मार्च महिन्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णासंख्या पाचशे पेक्षा जास्त वाढत आहेत,यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज.बी.पी यांनी जमावबंदी व आंदोलन करण्यास बंदी घातल्याचे आदेश काढले असता भाजप, काँग्रेस, प्रहार, मनसे आदी पक्षाच्या नेत्यांची आंदोलने जिल्ह्यातील विविध ठिकाणी झाली आहेत. या आंदोलनात प्रमाणापेक्षा जास्त आंदोलक एकत्र आले होते.

जिल्ह्यात उदगीर व पानगाव इथं आठवडी बाजार भरला असून विनामास्क व सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. यामध्ये अहमदपूर इथं भाजपचं रास्ता रोको आंदोलन,मनसेचे चाकूर इथं तहसील कार्यालयात आंदोलन,भाजपचे लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन,काँग्रेसचे जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन,प्रहार संघटनेचे रेणापूर इथं शोले स्टाईल आंदोलन यावर आंदोलकावर वेळोवेळी जिल्हाधिकारी यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असले,तरी एका मागून एक आंदोलने सुरू असल्याने कोरोनाच्या रुग्णासंख्या वाढत आहे.

लातूर जिल्ह्यात शहरी भागात 50 % तर ग्रामीण भागात 50 % रुग्णासंख्या आहे नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करण्याचं आवाहन केले आहे. तरी देखील कोरोनाचा आलेख काही कमी होताना दिसत नसल्याने सध्या प्रशासनाने कडक निर्बंध लावले असले, तरीही बेफिकीर नागरिक बाजारात अद्यापही विनामास्क फिरताना आढळत आहेत.

बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याची काही ठिकाणी स्थिती निर्माण झाली आहे. लातूर शहर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे जिल्हाअधिकारी यांनी केलं आहे. गरज भासल्यास लातुर मध्ये लॉकडाऊन नक्कीच लावावे लागेल असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. 

Edited By -Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live